Health

कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते. पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात.

Updated on 24 September, 2020 12:25 PM IST



कोबीमध्ये साधारणपणे व्हिटॉमीन सी, के आणि ए जास्त प्रमाणात असते.  पायरी डॉक्सिन, थायमिन, रायबा प्लेविन, नियासिन यासारखे आवश्यक जीवनसत्वे कोबीमध्ये असतात. त्याबरोबरच मॅग्नीज, फास्फोरस, कॅल्शियम इत्यादी खनिजे कोबीमध्ये विपुल प्रमाणात असतात. कोबी हा एक चांगला फायबर स्त्रोत आहे.  कोबी हा पदार्थ फायटोकेमिकल्सचा संग्रह आहे.  हे संयुगे एंटीऑक्सीडेंट आहेत आणि कोबीमध्ये सापडलेला विद्राव्य फायबर सह रक्तातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास प्रभावी आहेत.  संशोधनानुसार दररोज २ ते १० ग्रॅम विद्राव्य फायबर खातात. तेव्हा लोकांना एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी एक लहान परंतु महत्वपूर्ण घट आढळली.  कोबीमध्ये फायटोस्टेरॉल नावाचे पदार्थ असून जे पाचक मुलखात कोलेस्ट्रॉलचे विरोधात करून एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात.

कोबीमधील पोटॅशियम एक महत्त्वपूर्ण खनिज असते हे खनिज हृदय गती आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. सोडियमच्या नकारात्मक परिणाम विरुद्ध रक्तवाहिन्या आराम देण्याचे काम पोटॅशियम करते.  लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी कोबीमधील मॅगेनीज आवश्यक असते. रोजच्या आहारात कोबीच्या समावेश केल्यास शरीरातील सी जीवनसत्त्वाची ५० टक्के गरज पूर्ण केली जाऊ शकते.  कोबीमुळे आतड्यांचा कर्करोग नियंत्रणात राहू शकतो,  तसेच शरीरातील रोगप्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे वाढते.  

हेही वाचा :शेंगदाण्याचे फायदे : पचनशक्ती सुधारेल अन् वाढवेल भूक

कोबीच्या सेवनाने मज्जातंतू आणि मेंदूचे काम उत्तमरित्या चालते  तसेच कोबीमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.  जर छातीत कफ झाला असेल तर कोबीचे सेवन नक्की करावे, यामुळे शरीरातील कफ पातळ होण्यासाठी मदत होते.  तसेच कोबीमुळे पोट साफ राहते आणि पचनक्रिया देखील सुरळीत चालते.  कोबीचा वापर आहारात केला तर पोटफुगी, पोट दुखी, गॅस असे प्रकार कमी होतात.  कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्याच्या परिणाम हा शरीराची पचनक्रिया सुरळीत होण्यावर होतो. मेटाबोलिजम मला नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असते.  तसेच विटामिन यु हे दुर्मिळ विटॅमिन असून ते ताज्या कोबीचा रसात मुबलक प्रमाणात मिळते.  याचा फायदा असा होतो की विटामिन यु हे अल्सर प्रतिरोधक म्हणून गुणकारी आहे.

English Summary: Cabbage is good for improving digestion
Published on: 24 September 2020, 12:19 IST