Health

बरेच आरोग्य तज्ञ म्हणतात की, शरीरात जाणवणाऱ्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. काही साध्या समस्या म्हणजे गंभीर कारणे असू शकतात. याची वेळीच काळजी न घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका उद्भवतो. बहुतेक लोक पायांमध्ये विशेषतः पायाचे तळवे जळजळ करण्याच्या समस्येकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात.

Updated on 21 July, 2022 12:37 PM IST

 बरेच आरोग्य तज्ञ म्हणतात की, शरीरात जाणवणाऱ्या कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. काही साध्या समस्या म्हणजे गंभीर कारणे असू शकतात. याची वेळीच काळजी न घेतल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांचा धोका उद्भवतो. बहुतेक लोक पायांमध्ये विशेषतः पायाचे तळवे जळजळ करण्याच्या समस्येकडे सामान्य म्हणून दुर्लक्ष करतात.

परंतु अशा काही परिस्थितीमध्ये ही समस्या गंभीर आजारामुळे देखील होऊ शकते. त्याची वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर स्वरूपाचे परिणाम देखील होऊ शकतात.

 पायात जळजळ होण्याची कारणे

 पायामध्ये जळजळ होण्याची अनेक कारणे असू शकतात. सर्वात सामान्य कारण म्हणजे नसा खराब होणे हे होय. बऱ्याचदा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये, मज्जातंतूच्या समस्येमुळे पायाची जळजळ होऊ शकते.

याशिवाय काही परिस्थितींमध्ये, जीवनसत्वे आणि पोषक तत्वांचा कमतरतेमुळे देखील पायांमध्ये जळजळ होते. त्यामुळे त्याच्या खऱ्या कारणांचे वेळीच निदान करणे आवश्यक मानले जाते. जेणेकरून इतर कोणतेही गंभीर समस्या पाहता येईल.

नक्की वाचा:Health Tips: सावधान! नॉर्मल हाताचं दुखणं देखील असू शकतं 'या' गंभीर आजाराचे लक्षण, वेळीच सावध व्हा, नाहीतर….

 या असू शकतात गंभीर समस्या

1- डायबेटिक न्युरोपॅथी- यामध्ये पायात जळजळ होण्याची समस्या सामान्य मानले जाते.वर्षानुवर्ष अनियंत्रित उच्च रक्तातील साखर तुमच्या रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंना नुकसान पोहचवते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे मज्जातंतू मधून सिग्नलचे प्रसारण कमी होते. उच्च रक्तातील साखरेमुळे रक्तवाहिन्यांच्या भित्तीका देखील कमकुवत होतात, त्यामुळे पाय  जळजळ करण्याचा धोका आणि इतर अनेक समस्या असू शकतात.

2- पोषक तत्वांची कमतरता-शरीरास पोषक तत्वांचा कमतरतेमुळे पायाची जळजळ होण्याची समस्या दिसू लागली आहे.विटामिन b12, विटामिन बी 6 किंवा विटामिन बी 9( फोलेट)ची कमतरता आहे या प्रकारच्या समस्या याचे मुख्य कारण म्हणून ओळखले जाते.

विटामिन बीच्या कमतरतेमुळे पायात जळजळ आणि स्नायूंच्या समन्वयात समस्या निर्माण होतात.अशा समस्या वेळीच ओळखणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

नक्की वाचा:Health Tips: सावधान! शरीरावर असतील लाल चट्टे तर करू नका दुर्लक्ष, असू शकत 'या' आजाराचे लक्षण; वेळेत करा उपचार, अन्यथा….

3- थायरॉईड विकार-  कमी सक्रिय थायरॉईड मुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर ही परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या नसांवर दाब पडून सूज येऊ शकते.

पाय जळजळणे व्यतिरिक्त हायपोथायरॉईडझम मध्ये थकवा, वजन वाढणे आणि कोरडी त्वचा हे देखील लक्षण असू शकते.थायरॉईड विकारांचे वेळेवर निदान आणि उपचार करणे आता आवश्यक मानले जाते.त्यामुळे शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात.

4- इन्फेक्शनमुळे-पायाची जळजळ होण्याची समस्या शरीरात काही प्रकारच्या इन्फेक्शनमुळे देखील होऊ शकते.

एचआयव्ही आणि सिफीलिस सारख्या समस्यांमुळे काही लोकांना तळव्यांमध्ये जळजळ होण्याचा अनुभव येऊ शकतो.

तुम्हाला संसर्ग झाला आहे आणि पाय जळजळ करत आहेत असे तुम्हाला वाटत असल्यास, त्वरित डॉक्टरांना भेटावे. संसर्गाचा वेळीच उपचार न केल्यास शरिराच्या इतर भागांना त्रास होऊ शकतो.

( टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठल्याही वैद्यकीय उपचारांसाठी आणि आहारात बदल करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

नक्की वाचा:Health Tips: सावधान! पावसाळ्यात चुकूनही या पालेभाज्या खाऊ नका; नाहीतर आरोग्यावर होतील घातक परिणाम

English Summary: burning in foot symptoms of can create serious disease in body
Published on: 21 July 2022, 12:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)