1. आरोग्य

म्हशीच्या दुधात आहेत आरोग्यदायी घटक; वाढते रोगप्रतिकारक शक्ती

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


दुध म्हटलं की आपल्याला एक बाब लक्षात येते ते म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का नाही. म्हैशीचे दूध हे पौष्टिक नसते. विशेषत लहान मुलांसाठी म्हैशीचे दूध चांगले नसते, असा आपला समज आहे. आपल्या शरिरासाठी पौष्टीक असते ते गायीचे दूध. पण आज आम्ही तुम्हाला एक अगळी माहिती देत आहोत ही माहिती वाचून तुमचा  म्हैशीच्या दुधाविषयीचा असमज दूर होणार आहे. दरम्यान देशाच्या अनेक भागात अनेक जातीच्या म्हशी पाळल्या जातात. या म्हैशींची दूध देण्याची क्षमता वेगवेगळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, म्हैशींच्या दुधात अनेक विविध घटक आहेत जे आपल्या शरिरासाठी पोषक आहेत.  हाडांची मजबूती वाढविण्यासाठी म्हैशीचे दूध खूप उपयुक्त आहे. यासह हृद्य, वाढ, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही म्हैशीचे दूध फायदेकारक आहे.

Buffalo milk nutrients

काय आहेत म्हशीच्या दुधातील घटक

आ म्हशीच्या दुधात अनेक पौष्टिक घटक आहेत. कॅल्शियम, लोह, प्रथिने, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए, आणि इतर पौष्टिक घटक असतात. इतकेच काय गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक फॅक्ट असतात.

Nutrition पोषण तत्व

Buffalo Milk म्हशीचे दूध

Water  पाणी

81.1%

Protein(g)      प्रथिने    

4.5g

Fat   फॅट      

8g

Carbohydrate   कार्बोहायड्रेट

4.9g

Energy एनर्जी

110 kcal

Sugar lactose  सुगर  

4.9g

Saturated Fat  सॅच्युरेटेड फॅट

4.2g

Monounsaturated Fat  

मोनोअनसॅच्युरेटेड फॅट

1.7g

Polyunsaturated Fat

पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट       

0.2g

Cholesterol कोलोस्टेरॉल
       

8mg

Calcium कॅल्शिअम              

195 µg

Buffalo milk benefits म्हशीच्या दुधाचे फायदे 

ज्या लोकांना आपली मसल muscle (स्नायू) वाढवयाचे आहेत त्यांच्यासाठी म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. गायीच्या दुधापेक्षा म्हशीच्या दुधात अधिक प्रथिने असल्याचे अनेक तज्ज्ञ सांगतात. वाढीसाठीही म्हशीचे दूध चांगले असते. यासह हृदयाच्या आरोग्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. इतकेच काय रक्तदाब आणि हायपर टेन्शनच्या समस्या दूर ठेवण्यास म्हशीचे दूध खूप उपयुक्त आहे. या दुधात कोलेस्टॉलचे प्रमाण कमी असल्याने हृदयासाठी हे फायदेशीर आहे. हाडे मजबूत करण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी म्हशीचे दूध चांगले आहे. कॅल्शिअमसह तांबे, मँगनीज, जस्त, आणि फॉस्फरसारख्या इतर खनिज पदार्थही या दुधात असल्याने हाडे मजबूत होण्यास उपयुक्त ठरते. तर म्हशीच्या दुधात व्हिटॉमीन ए आणि व्हिटॉमीन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters