Health

Brinjal Side Effects : मित्रांनो आपण आपल्या आहारात वांग्याचा अवश्य समावेश करत असतो. वांग्याची भाजी ही अनेकांची आवडती आहे. विशेष म्हणजे वांग्याचे सेवन आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर (Brinjal Benefits) आहे कारण की वांग्यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. आरोग्यासोबतच वांगी (Brinjal) चवीलाही खूप चांगली असतात, प्रत्येक ऋतूत मिळणारी वांग्याची भाजी किंवा भरता खूप चविष्ट बनते.

Updated on 20 September, 2022 8:28 AM IST

Brinjal Side Effects : मित्रांनो आपण आपल्या आहारात वांग्याचा अवश्य समावेश करत असतो. वांग्याची भाजी ही अनेकांची आवडती आहे. विशेष म्हणजे वांग्याचे सेवन आरोग्यासाठी (Health) देखील फायदेशीर (Brinjal Benefits) आहे कारण की वांग्यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. 

आरोग्यासोबतच वांगी (Brinjal) चवीलाही खूप चांगली असतात, प्रत्येक ऋतूत मिळणारी वांग्याची भाजी किंवा भरता खूप चविष्ट बनते. पण तुम्हाला माहित आहे का की काही लोकांना वांग्याचे सेवन धोकादायक देखील ठरू शकते.

अशा परिस्थितीत आज आपण कोणत्या लोकांनी वांग्याचे सेवन करू नये (Side Effect Of Brinjal) या बहुमूल्य माहिती विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.

कमकुवत पाचक तंत्र 

जर तुमची पचनक्रिया कमजोर असेल किंवा पाचनतंत्र संबंधित आपणास काही विकार असतील तर वांग्याची भाजी खाणे टाळावी. जर तुम्ही वांग्याचे सेवन केले तर तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते.

ऍलर्जी

जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर वांगी खाऊ नका, कारण वांगी खाल्ल्याने हा त्रास वाढू शकतो.

नैराश्य

तुम्ही नैराश्याचे औषध घेत असाल किंवा नैराश्याने त्रस्त असाल तर वांगी खाणे टाळा. नैराश्याच्या रूग्णांमध्ये नैराश्य वाढते, तर औषधे घेतल्यास त्याचा परिणामही कमी होतो.

अशक्तपणा

जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही वांगी खाणे टाळावे. असे केल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास त्रास होतो.

डोळ्यांची जळजळ

जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल आणि विशेषत: तुम्हाला जळजळ किंवा सूज येत असेल तर वांग्याचे सेवन करू नका.

मूळव्याध

जर तुम्हाला मूळव्याधचा त्रास असेल तर वांगी खाणे टाळा.  नाहीतर तुमची समस्या वाढेल.

मुतखडाची समस्या

जर तुम्हाला मुतखडा असेल तर वांग्याचे सेवन अजिबात करू नका. वांग्यात आढळणारे ऑक्सलेट मुळे स्टोनची समस्या वाढते.

English Summary: brinjal side effects do not eat brinjal in this disease
Published on: 20 September 2022, 08:28 IST