Health

सध्या दैनंदिन जीवनात धावपळ आणि ताण तणाव खूप प्रमाणात वाढले असल्यामुळे एकंदरीत जीवनाचा रुटीनच बिघडल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आहार होय. परंतु बरेच जण बाहेरील अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खात असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.

Updated on 09 October, 2022 10:35 AM IST

सध्या दैनंदिन जीवनात धावपळ आणि ताण तणाव खूप प्रमाणात वाढले असल्यामुळे एकंदरीत जीवनाचा रुटीनच बिघडल्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आहार होय. परंतु बरेच जण बाहेरील अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खात असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शरीरावर होतो.

या सगळ्या आरोग्याच्या समस्या मध्ये एक समस्या म्हणजे वजन वाढणे ही होय. जास्त वजनामुळे अनेक व्यक्ती त्रस्त आहेत कारण वजन कमी करण्यासाठी बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात.परंतु हवे तेवढे यश मिळत नाही.

वाढत्या वजनाची समस्या खूपच गंभीर असून यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात जसे की हृदय रोगाची समस्या,मधुमेह इत्यादी आजार देखील होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपले वजन नियंत्रित करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे वजन कमी करण्यास  मदत करणाऱ्या ब्लूबेरीची या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

नक्की वाचा:Health Tips: जर तुम्ही कारल्याचा रस प्याल तर अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या होतील चुटकीसरशी दूर, वाचा डिटेल्स

 ब्लूबेरी आहे वजन कमी करण्यासाठी उपयोगी

 जर आपण ब्लूबेरीचा विचार केला तर यामध्ये असलेल्या अँटिऑक्सिडट आणि फ्लेवोनॉइड्स गुणधर्म असल्यामुळे ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी तसेच विविध प्रकारच्या रोगांपासून संरक्षण आणि प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर मानली जाते.

ब्लूबेरी मध्ये खूप प्रमाणात फायबर तसेच विटामिन सी, विटामिन के आणि मॅग्नीज असल्यामुळे उच्च रक्तदाब तसेच मधुमेह आणि कॅन्सर सारख्या आजारांमध्ये देखील ब्लूबेरीचे सेवन फायद्याचे ठरते.

जर आपण वाढत्या वजनाचा विचार केला तर वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम गरजेचा आहेच परंतु संतुलित आहाराचे पालन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे 

यासाठी ब्लूबेरी तुम्हाला मदत करू शकते. ब्लूबेरीमध्ये अनेक पोषक तत्वे आणि गुणधर्म असल्यामुळे शरीराला कोणतीही हानी न होता वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.  तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी देखील ब्लूबेरी मदत करते.

नक्की वाचा:Health Tips: सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी अंकुरलेले हरभरे खाण्याचे 'हे' मिळतात जबरदस्त फायदे, वाचा डिटेल्स

 ब्लूबेरी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ब्लूबेरी मध्ये अँथोसायनिन सॉल्ट कंपाउंड आढळते जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे ब्लूबेरीचे सेवन जर केले तर वजन झपाट्याने कमी व्हायला मदत होते.

2- तसेच ब्लूबेरी मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पोट खूप वेळपर्यंत भरलेले राहते त्यामुळे वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे हीच बाब वजन कमी करण्याच्या बाबतीत मदत करते.

3- तसेच ब्लूबेरीचे सेवन पचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि विविध शारीरिक समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.यामध्ये असलेले फायबर पोट निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

4- ब्लूबेरी मध्ये असलेले जीवनसत्त्वे तसेच फ्रुक्टोज, सोडियम आणि इतर ऍसिड असल्यामुळे इतर पचन संस्था बळकट करण्यासाठी देखील फायदेशीर आहे. शरीरातील चयापचय क्रिया देखील व्यवस्थित ठेवण्यासाठी ब्लूबेरी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ब्लूबेरीचे सेवन वजन कमी करण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाचे आहे.

 वजन कमी करण्यासाठी ब्लूबेरीचे सेवन कसे करावे?

ब्लू बेरी हे फळ असल्यामुळे तुम्ही अनेक पद्धतीने सेवन करू शकतात. तुम्ही ब्लूबेरी शेक किंवा स्मुदी बनवू शकता आणि दररोज त्याचे सेवन  करू शकतात. तसेच तुम्ही ब्लूबेरी थेट देखील सेवन करू शकतात. त्यासोबतच दही किंवा दलिया मध्ये मिसळून देखील खाता येते.

( टीप- वरील माहिती विविध स्रोतांकडून घेतली असून ती वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठल्याही उपचारासाठी आणि आहारात बदल करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)

नक्की वाचा:Health Update: भावांनो! किडनी ठेवायची असेल निरोगी तर आजच सोडा 'या' सवयी, वाचा महत्वपूर्ण माहिती

English Summary: blueberry is so benificial and useful in wieght loss and give many health benifit
Published on: 09 October 2022, 10:35 IST