कधी कधी हा प्रकार गंभीर असल्याचेही दिसून येते. मात्र रक्ताची गाठ होते म्हणजे नेमके काय होते. आणि त्याचे परिणाम काय होतात याची आपल्याला कल्पना येत नाही.रक्तवाहिन्यांमध्ये पुरेसे घटक नसले, तर ‘डीव्हीटी’ नावाचा आजार होतो. प्रोटीन किंवा म्युटेशन नसल्यानं रक्त गोठतं. जास्त पाणी न पिणं, डिहायड्रेशनमुळे रक्त गोठणं, एकाच स्थितीमध्ये पाय न हलवल्यास त्या व्यक्तीमध्ये पायाच्या नसांमध्ये रक्ताची गुठळी होण्याची शक्यता असते. जास्त वेळ उभं राहणं किंवा सातत्यानं बसून काम करण्याच्या स्थितीमुळे रक्तवाहिन्या फुगतात. त्या पेशंटला ‘डीव्हीटी’ (deep venus thrombosis) हा आजार बळावतो. काही रक्तवाहिन्यांमध्ये पारदर्शक घटक (वेब) असतात. त्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळेही ‘डीव्हीटी’चा आजार होतो. रक्ताच्या आजारांचं निदान करणं अनेकदा अशक्य होतं. डीव्हीटी आजारातील सुमारे 50 टक्के केसेसमध्ये हा आजार का होतो त्याची कारणं कळत नाहीत.
त्यासाठी योग्य ते उपचार घ्यावे लागतात,’ अशी माहिती रक्तविकार तज्ज्ञ डॉ. मुंडे यांनी दिली.उपचार कोणते?काही वर्षांपूर्वी ‘डीव्हीटी’चा आजार झाल्यास रक्तपातळ करण्याची औषधं आयुष्यभर सुरू ठेवावी लागत होती. त्या उपचाराच्या पद्धतीत कालानुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे बदल झाला आहे. ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ हे उपचार दिले जातात. जिथं गुठळी झाली आहे, त्या ठिकाणी रक्तवाहिनीला छिद्र केलं जातं. तिथून ट्यूब टाकून त्या माध्यमातून गाठ बाहेर काढली जाते. त्या उपचार पद्धतीला ‘कॅथेटर डायरेक्टेड थ्रोम्बोलायसिस’ म्हणतात. या उपचाराच्याही पुढील उपचार आहेत. त्या उपचार पद्धतीला ‘अँजिओजेट’ म्हणतात. या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एका बाजूनं रक्त बाहेर काढलं जातं आणि दुसऱ्या बाजूनं रक्त आत घेण्यात येतं. त्यामुळे गुठळ्या बाहेर पडणं शक्य होतं.
पूर्वी कॅथेटरनं गुठळ्या बाहेर काढण्यासाठी तीन ते चार तासांचा कालावधी लागत होता. आता केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये गुठळ्या बाहेर निघतात, असेही डॉक्टरांनी सांगितले.रक्तवाहिन्यांच्या आजाराची लक्षणे रक्तवाहिन्या फुगण्यामुळे अथवा रक्ताच्या गुठळीमुळे आजार बळावतात. पाय दुखणं, पोट दुखणं, पोटातील नसांमध्ये दुखणं, पाय लाल होणं, गरम होणं, सूज येणं अशी लक्षणं दिसतात. पायात रक्ताची गुठळी झाल्यास ती फुफ्फुसांमध्ये जाते आणि त्याला ‘पल्मोनरी एम्बोलिझम’ म्हणतात. ती गाठ काढण्यासाठीही ‘अँजिओजेट’ या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पेशंटचा प्राण वाचू शकतो. या गुठळ्या होऊ नये यासाठी पोटातील सर्वाधिक मोठ्या रक्तवाहिनीत फिल्टर टाकला जातो.रक्ताची गाठ कधी होऊ शकते ?पायाच्या स्नायूंना दुखापत झाल्यास, पाय हलवला नाही, तर रक्ताची गुठळी होऊ शकते.
त्याशिवाय बाळंतपणामध्ये गर्भाशय मोठं झाल्यास रक्तवाहिन्यावर दाब येऊन प्रवाह कमी होतो. त्यावेळी रक्त गोठण्याची शक्यता असते. मेंदूच्या रक्तवाहिनीत गाठ झाल्यास ‘पॅरालिलिस’चा झटका येऊ शकतो. त्यालाच ‘ब्रेन ऍटेक’ म्हणतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीत गाठ असल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पायांच्या नसांमध्ये गुठळी झाल्यास त्याला ‘लेग ऍटेक’ म्हणतात. या आजारांचे वेळीच योग्य निदान झालं, तर त्याच्यावर वेळेत उपचार करता येतात. त्यावर हृदयाप्रमाणे अँजिओप्लास्टी, बायपासचं ऑपरेशन करता येतं,’ अशी माहिती रक्तविकार तज्ज्ञ डॉ. धनेश कामेरकर यांनी दिली.त्यासाठी उपाय काय कराल?बैठ्या कामात सातत्यानं ब्रेक घ्या. दीर्घकाळ एकाच अवस्थेत बसून काम करत राहू नका. आपली बसण्याची स्थिती सतत बदलत राहा.
Published on: 24 May 2022, 01:25 IST