1. आरोग्य

स्तनांचा कर्करोग रोखण्यास उपयुक्त आहे काळी मिरी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
काळ्या मिरीचे आरोग्यदायी फायदे

काळ्या मिरीचे आरोग्यदायी फायदे

मसाले व मसाले युक्त पदार्थ हे फक्त जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी असतात असं नाही. तर काही मसाल्याचे पदार्थ हे शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे.

त्यातील काळी मिरी ती अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. काळा मिरीत  असलेल्या लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, झिंक, ए जीवनसत्व आणि सी जीवनसत्त्व या बरोबरच अनेक पोषक द्रव्ये असतात. या लेखात काळी मिरी चा आरोग्यविषयक फायदे जाणून घेऊया.

स्तानांचा कर्करोग

 एका संशोधनानुसार स्तनाचा कर्करोग रोखण्यासाठी काळी मिरीचा खूप फायदा होतो. काळी मिरीचे नियमित सेवन केल्यास स्तनाच्या कर्करोगाच्या गाठी तयार होऊ शकत नाही. काळी मिरीमध्ये सी विटामिन्स, ए  विटामिन्स कॅरोटीन आणि अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे कर्करोग होण्यास मदत मिळते.

अपचन आणि जुलाबसाठी उपयुक्त

 अपचन, जुलाब तसेच बद्धकोष्ठता त्यावरचा रामबाण उपाय म्हणून काळीमिरी सेवन करता येते. काळी मिरी चा सेवनाने पचनशक्ती वाढते. काळी मिरी खाल्याने तोंडाला चव येत असल्याने अन्नातील रुचकर पणा  वाढतो. पोट फुगणे, अपचन, जुलाब इत्यादी समस्या काळीमिरी च्या सेवनाने दूर होतात.

हेही वाचा : कावीळ रोगासह मुतखड्यावर गुणकारी आहे ऊसाचा रस

 पोटातील गॅसेस दूर होतात

 पोटात जर गॅसेस झाले असतील तर काळीमिरी हा त्यावरचा रामबाण इलाज आहे. काळा मिरित वातहर गुण असल्यामुळे काळा मिरी  चे सेवन केल्याने पोटात वायू साठवून राहू शकत नाही. तो सहजपणे सुटा होतो. काळेमिरे मुळे पोटात वायू होण्याची समस्या प्रभावीपणे दूर होते.

 

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

 काळी मिरी नियमितपणे सेवन केल्यास वजनावर नियंत्रण ठेवता येते. काळी मिरी असलेल्या फायटो न्यूट्रिएंट्स मुळे चरबीचा बाह्य थर  मोडण्‍यास मदत होते.त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. या प्रक्रियेत शरीराला अतिरिक्त घाम येतो, सारखे लघवीला जावे लागते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जाऊन वजन कमी होते.

 त्वचेसाठी उपयुक्त

 काळा मिरीचा चेहऱ्याला स्क्रब म्हणून वापर केल्यास त्वचा चमकदार होते आणि याच त्यामुळे त्वचेवरील मृत त्वचा निघून जाण्यास मदत मिळते. तसेच त्वचेचे पोषण होते. परंतु चेहऱ्यावर मिरीचा वापर करताना कमी प्रमाणात आणि काळजीपूर्वक वापरावा. खूपच नाजूक प्रकारची त्वचा असणाऱ्यांनी याचा वापर टाळावा. या स्क्रब साठी काळी मिरी बारीक करून घ्यावी पण एकदम मऊसर बारीक न करता थोडी जाडसर राहू द्यावी.

 सर्दी व खोकला साठी उपयुक्त

 सर्दी होणे, कफ आणि नाक चोंदणे या त्रासात आराम मिळतो. खोकला कमी होण्यास मदत होते. सर्दीमुळे नाक वाहत असल्यास काळीमिरी चे सेवन केल्याने आराम पडतो. कफ आणि छातीत झालेला कफ यावर ही मिरी चा फायदा होतो. तसेच दुधाबरोबर काळीमिरी घेतल्यास फायदा होतो.

 

भूक वाढवण्यासाठी उपयुक्त

 भूक जर लागत नसेल तर काळीमिरी घातलेले अन्नग्रहण करावे. त्यामुळे भूक लागते तसेच काळी मिरी मुळे पदार्थातील सर्व पोषक तत्व शोषून घेतात. त्यामुळे शरीराला पोषक तत्त्व ही मिळतात तर काळीमिरी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश असेल तर अन्नाचे पचन योग्य पद्धतीने होते.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters