Health

मित्रांनो तुम्ही काळे सफरचंद पाहिले आहे का? नाही, तर मग काळे सफरचंद सुद्धा असते, ते अगदी लाल आणि हिरव्या सफरचंद प्रमाणेच उगवले जाते. काळे सफरचंद हे चवीला खुपच रुचकर असते शिवाय याचे आयुर्वेदिक गुणधर्ममुळे हे खुप लोकप्रिय ठरत आहे. हि सफरचंदची एक दुर्मिळ जात आहे जी जगात खुपच तुरलक ठिकाणी आढळून येते.

Updated on 17 December, 2021 9:48 AM IST

मित्रांनो तुम्ही काळे सफरचंद पाहिले आहे का? नाही, तर मग काळे सफरचंद सुद्धा असते, ते अगदी लाल आणि हिरव्या सफरचंद प्रमाणेच उगवले जाते. काळे सफरचंद हे चवीला खुपच रुचकर असते शिवाय याचे आयुर्वेदिक गुणधर्ममुळे हे खुप लोकप्रिय ठरत आहे. हि सफरचंदची एक दुर्मिळ जात आहे जी जगात खुपच तुरलक ठिकाणी आढळून येते.

अनेक शेतकरी बांधव काळे सफरचंदची लागवड करण्यासाठी उत्सुक असतात पण हे कदापि शक्य नाही कारण की हि सफरचंदची जात फक्त विशिष्ट अशा हवामानात वाढू शकते, ती आपल्याकडे वाढू शकत नाही. आम्ही आपणांस सांगू इच्छितो की हि सफरचंदची जात भूटानच्या डोंगराळ भागात आढळते. ह्या जातीला हुआ नियु म्हणुन ओळखले जाते.

कीती असते काळ्या सफरचंदची किंमत? (How much does a black apple cost)हि जात आपल्याकडे मिळत नाही. काळे सफरचंद हे किलोप्रमाणे विकले जात नाही तर ते नगप्रमाणे विकले जाते. एका काळ्या सफरचंदची किंमत हि जवळपास 500 रुपयाच्या आसपास असते. यावरून याची मागणी हि आपल्या लक्षात आली असेल.

काळे सफरचंद खाण्याचे फायदे (The benefits of eating black apples) याच्या रंगामुळे अनेक लोकांना शंका असते की आपण हे सफरचंद खाऊ शकतो की नाही? तुम्हालाहि जर असाच प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका आपण हे काळे सफरचंद खाऊ शकता आणि हे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. ब्लॅक डायमंड सफरचंद हा इतर सामान्य सफरचंदांप्रमाणेच आरोग्यदायी आहे. काळ्या सफरचंदात विरघळणारे फायबर जास्त असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे.

याव्यतिरिक्त, त्यात अघुलनशील फायबर असतात, जे पचनास मदत करतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि ए सह पोटॅशियम आणि लोह देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे काळ्या सफरचंदचे सेवन हे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे.

टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे कोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: Black apple benificial for human health know its advantages
Published on: 17 December 2021, 09:40 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)