कारले म्हटले तर त्याच्या कडूपणामुळे अनेकजण नाक मुरडतात. परंतु या कडू कारल्याचे जर आरोग्यदायी फायदे पाहिले तर आपण आचार्यचकित व्हाल. या औषधी गुणांमुळे आपणही कारले खाण्यास प्रेरित व्हाल यात शंका नाही. दरम्यान आपण या लेखात कारले खाण्याचे आरोग्यदायी फायदे विषय जाणून घेणार आहोत.
रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यात मदत
मधुमेहींसाठी कारले वरदान ठरते. कारल्याच्या रसात समप्रमाणात गाजराचा रस घालून पिल्याने ब्लड शुगर नियंत्रणात राहते. सकाळच्या वेळेस कारल्याचा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
स्टोनची समस्या असणाऱ्यासाठी फायदेशीर
जर स्टोनची समस्या असेल तर कारल्याचा रस पिणे किंवा भाजी खाणे फायदेशीर ठरते. त्यामुळे स्टोनची समस्या कमी होण्यास मदत होते. 20 ग्रॅम कारल्याचा रसात मध आणि थोडेसे हिंग घाला आणि प्या.
भूक लागण्यासाठी सहाय्यक
जर तुम्हाला कमी भूक लागत असेल तर कारल्याचे सेवन करणे फायदेशीर ठरते. त्यामुळे भूक वाढीस मदत होते. भुक कमी लागल्यामुळे शरीराचे पोषण व्यवस्थित होत नाही. त्याचा परिणाम वा स्वास्थ्यावर होतो व स्वास्थ्य संबंधी अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे कारल्याचा रस पिणे किंवा कारल्याची भाजी खाणे उपयुक्त ठरते.
त्वचेसाठी फायदेशीर
दाद, खरुज, सोरायसिस यासारख्या त्वचा रोगांवर कारल्याचा रसात लिंबाचा रस घालून पिणे लाभदायक ठरते.
डायरियावर गुणकारी
कारल्याच्या रसात थोडेसे पाणी आणि काळे मीठ घालून त्याचे सेवन करणे फायद्याचे असते. यकृत संबंधी आजार असल्यास त्यावर कारले गुणकारी ठरते. अर्धा कप पाण्यात दोन चमचे कारल्याचा रस घालून घेतल्यास डायरियावर फायदा होईल.
जाडेपणावर ही उपयुक्त
कारल्याच्या रसात एक चमचा लिंबाचा रस घालून रोज सकाळी दोन महिन्यापर्यंत सेवन केल्यास शरीरात तयार होणारे टॉक्सिन्स दूर होतात आणि जाडेपणा कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर पचन तंत्र सुधारते आणि सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते.
कफापासून सुटका
कारल्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असल्यामुळे दररोज एक महिना कारल्याचे सेवन केल्याने कपाचा जुना त्रासही दूर होण्यास मदत होते. खोकल्याचा त्रास होईल कारले गुणकारी ठरते.
टीप- उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर असते.
Published on: 09 February 2021, 06:57 IST