Health

वाचकहो बाईक चालून पाठ फार का दुखते ? या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

Updated on 02 February, 2022 2:29 PM IST

वाचकहो बाईक चालून पाठ फार का दुखते ? या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.मित्रहो आज जवळ जवळ प्रत्येक घरात एक तरी बाईक नक्की असते.खरं तर हे कामासाठी,प्रवासासाठी वापरले जाणारे दुचाकी वाहन. आजची तरुण पिढी आवडीपायी ही मोठ्याप्रमाणात वापरताना दिसते.अठरा वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच मुले बाईक चालवायला शिकलेली असतात.बाईक चालवता येते पण बाईकवर कसे बसावे हे माहीत नसते.इतरांना बाईक चालवताना पाहिले की ते बाईकवर कसे बसतात हे लक्षात येते मात्र स्वतःला आपण कसे बसतो हे लक्षात येत नाही.यामुळे हौस भागते पण पाठदुखीला आमंत्रण मिळते.आता आपण याचे कारण पाहू.बाईकवर बसताना अनेक जण पाठीला पोक काढून बसतात.आपण असे ढिले पणाने बसल्यामुळे पाठीचे स्नायू मणक्याना नीट आधार देत नाहीत.हे समजण्यासाठी आपण कोणत्याही बाईक किंवा कारचे उदाहरण घेऊ.आपल्याला गाडीचे shock absorbers ठाऊकच आहेत.

या शॉक ऍब्सरबर मुळे गाडी चालताना ती स्मूथ पणे चालते.रस्ता कितीही ओबड धोबड असला तरी आपल्याला जास्त धक्के जाणवत नाहीत.कारण सर्व धक्के हे shock absorbers सहन करतात व सस्पेंशनवर वजन जाऊ देत नाहीत.यामुळे सस्पेंशनचे आयुष्य लांबते. मात्र शॉक ऍब्सरबर जर कमजोर किंवा विक झाले असतील तर सस्पेंशनची अक्षरशः वाट लागते.सर्व नटबोल्ट खिळखिळे होऊन जातात.वर्षभरात गाडीची खडखड सुरु होऊन गाडीचे आयुष्यमान कमी होऊन जाते.मित्रांनो आपल्या शरीराचेही असेच आहे.आपले मसल्स हे शोक ऍब्सरबर सारखेच काम करतात.सारा भार, धक्के स्वतःवर घेतात आणि सांध्यांवर (सस्पेंशन) जास्त वजन जाऊ देत नाहीत.इथे आपले मसल्स जितके लवचीक व मजबूत तितके ते धक्के सहन करण्यासाठी अधिक समर्थ ठरतात.म्हणून पाठीला, खासकरून कंबरेतील स्नायूना मजबूत करून ठेवायला पाहिजेत.त्यासाठी व्यायाम करावाच लागतो.पण आपल्याकडे "व्यायाम करणारे कमी आणि छाती काढून मिरवणारे जास्त" अशी परिस्थिती असते ती आता बदलायला पाहिजे.असो,ज्यावेळी आपण बाईकवर ढिलेपणाने बसतो,पुढे किंचित बाक काढून बसतो त्यावेळी पाठीचे स्नायू शिथिल अवस्थेत राहतात.त्यामुळे ते कंबरेतील माणक्याना आधार देण्यास असमर्थ ठरतात.आणि यामुळेच पाठदुखीची सुरवात होते.

पण आपण हे सहज टाळू शकतो.यासाठी विशेष काहीही करण्याची गरज नाही.फक्त एक काम करायचे.कोणतीही बाईक असो, आपण त्यावर बसताना ताठ बसायला पाहिजे. म्हणजे खांदे ते कंबर ही सरळ ताठ असावी.मागून किंवा साईडने पाहिले की पाठ अगदी सरळ दिसते.कुठेही पाठीला बाक किंवा पोक आलेले दिसत नाही.अशा पद्धतीने बसल्याने,म्हणजे पाठ एकदम सरळ ठेवल्याने कंबरेतील महत्वाचा स्नायू spine erectors हा स्नायू आकुंचन (contract) पावून कंबरेला उत्तम आधार देतो.गाडीचे सर्व धक्के स्वतःवर झेलतो आणि कंबरेला म्हणजेच मणक्यांना शाबूत ठेवतो.याचा परिणाम म्हणजे कितीही बाईक चालवली तरी पाठीचा त्रास जाणवत नाही.म्हणून माझ्या बाईकर मित्रांनो बाईकवर ताठ रुबाबात बसा.सगळ्यावर इम्प्रेशन पाडा आणि पाठदुखीला दूर पळवून लावा.याचबरोबर कंबरेला बळकट करणारे व्यायाम म्हणजे कोब्रा पोज,एक्वा पोज, हिप एक्सटेन्शन अथवा सुपरमॅन पोज यापैकी एखाद दुसरा प्रकार नियमित करावा. आपण जर योगासने करीत असाल तर भुजंगासन,अर्ध व पूर्ण शालभासन, नौकासन अशी पाठीला मजबूत करणारी आसने करा.यामुळे लोअरबॅक मजबूत होते व अनेक आघात सहजपणे झेलू शकते.दुसरे म्हणजे बाईक चालवताना हेल्मेट डोक्यावर घालायला विसरू नका.(अनेक जण फक्त पोलीस दिसले कि ते डोक्यावर घालतात,अन्यथा ते हातात अडकवलेले असते).हे चित्र बदलायला पाहिजे. 

हे नियम आपले आरोग्य ठीक राहावे, आपला अपघात होऊ नये आणि कधी चुकून साधारण अपघात झाला तरी आपला जीव वाचावा या शुद्ध हेतूने लागू केलेले आहेत.हेल्मेट शिवाय बाईक चालवल्याने हवेतील अनेक दूषित कण हवेच्या वेगामुळे चेहऱ्यावर घट्ट चिटकून बसतात यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य बिघडू लागते,चेहरा काळवटतो, डोळ्यांना इजा पोहोचून त्यांचे आरोग्य बिघडते. केसात धूळ अडकून केस राठ होतात व केसांचा नैसर्गिक मऊपणा कमी होतो.केस गळण्याच्या समस्या निर्माण होतात.नाकातून दूषित हवा फुफ्फुसात गेल्याने फुफ्फुसांचे आरोग्य बिघडते.म्हणजे हेल्मेट शिवाय बाईक चालवल्याने काही वेळेसाठी हिरो झाल्याप्रमाणे वाटत असले तरी आरोग्य बिघडतेच याच शंका नाही.सौंदर्य प्रसाधनांचा जास्तीत जास्त खर्च चेहरा आणि केस यावरच होत असतो हेही लक्षात असुद्या.म्हणून अपघातापासून स्वतःला वाचवा.चेहऱ्याचे सौंदर्य वाढवा.केसांचे आयुष्यमान वाढवा.पाठदुखीसारख्या जर्जर विकारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि हे सर्व साधण्यासाठी फक्त एकच करा ते म्हणजे हेल्मेट घालून अगदी ताठ बसून रुबाबात बाईक चालवा.

 

लेखक - दत्ता गायकवाड

वेलनेस कन्सल्टंट

संपर्क - 9821234080

English Summary: Bike ride time back pain away
Published on: 02 February 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)