Covid-19 Surge In India: देशात मागील काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा दहशत दिसून येत आहे. मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. देशातील सक्रीय म्हणजेच अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या मागील काही दिवसांमध्ये वाढली आहे. केंद्र सरकारबरोबर राज्यांमधील सरकारांकडून लोकांना कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करावे असं सांगितलं जात आहे.
सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य
कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.
गर्दीच्या ठिकाणी जाताना लोकांनी मास्कचा वापर करावा असं वारंवार सांगितलं जात आहे. मात्र तरीही याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. काल आणि आज म्हणजेच 9 आणि 10 एप्रिल रोजी मॉक ड्रील करण्यात येत आहे. यामध्ये रुग्णालयांमधील तयारीची चाचपणी केली जाणार आहे. असं असतानाच भारतीय मेडिकल असोसिएशन म्हणजेच आयएमएने देशातील कोरोना वाढीमागील 3 कारणांचा खुलासा केला आहे.
यंदा दुष्काळी परिस्थिती? सरासरीच्या 'इतक्या' टक्केच पावसाचा अंदाज
सध्या देशात किती रुग्ण?
मागील 24 तासांमध्ये देशात कोरोनाचा नव्याने संसर्ग झालेल्या 5,880 रुग्ण आढळून आले आहेत. याचबरोबर देशातील करोनाबाधितांची संख्या 4 कोटी 47 लाख 62 हजार 496 वर पोहोचली आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या 35 हजार 199 इतकी आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज म्हणजेच 10 एप्रिल 2023 रोजी सकाळी 8 वाजता ही आकडेवारी जारी केली आहे. मागील 24 तासांमध्ये दिल्ली आणि हिमाचलमध्ये प्रत्येकी 4 तर महाराष्ट्र, राजस्थान, जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये प्रत्येकी एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
आनंदाची बातमी! कापसाच्या दरात मोठी वाढ, प्रतिक्विंटल मिळाला 'इतका' भाव
Published on: 10 April 2023, 04:32 IST