Health

नमस्कार मित्रांनो आज आपण हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कुठले फायदे होतात हे जाणून घेणार आहोत तसेच, हळदीचे दूध कसे बनवायला पाहिजे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. हळदीत आणि दुधात असलेले पोषक तत्त्वे आपल्या शरीराला अनेक रोगांपासून लढण्यास सक्षम बनवतात. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. अनेक आहार तज्ञ तसेच डॉक्टर्स हळदीच्या दुधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

Updated on 23 December, 2021 7:11 PM IST

नमस्कार मित्रांनो आज आपण हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला कुठले फायदे होतात हे जाणून घेणार आहोत तसेच, हळदीचे दूध कसे बनवायला पाहिजे याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत. हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. हळदीत आणि दुधात असलेले पोषक तत्त्वे आपल्या शरीराला अनेक रोगांपासून लढण्यास सक्षम बनवतात. याचे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढते. अनेक आहार तज्ञ तसेच डॉक्टर्स हळदीच्या दुधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

विशेषता कोरोनाच्या काळात अनेक लोकांनी हळदीच्या दुधाचे सेवन करायला सुरुवात केली आणि यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती देखील वाढली. पण अनेक लोक हळदीचे दूध बनवण्यात काही मिस्टेक देखील करतात त्यामुळे त्यांना पाहिजे तसा याचा फायदा मिळत नाही, म्हणून आज आपण हळदीचे दूध कसे बनवायचे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

हळदीच्या दुधाचे फायदे

मित्रांनो दुधात अनेक पोषक तत्वे असतात, यात प्रामुख्याने कॅल्शियम विटामिन ए, बी 2, बी 12, विटामिन डी, झिंक,पोटॅशियम इत्यादी पोषक तत्वे असतात. यामुळे याचे सेवन आपल्या शरीराला अनेक रोगांपासून वाचवते. आणि अशा गुणकारी दुधात हळद मिक्स केली तर याचे औषधी गुणधर्म अजुनच वाढवून जातात. आणि त्यामुळे हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने  आपल्या शरीरास अनेक फायदे मिळतात.

हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आपणास सर्दी खोकला सारखे आजार कधीच होणार नाहीत, शिवाय यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. आजारी असतांना हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने लवकर आजारपणातून सावरण्यात मदत होते. अनेक रिपोर्ट्स आणि संशोधने असे सांगतात की, हळद मध्ये ऑंटी कॅन्सर प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे याचे सेवन कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून वाचवू शकते असे सांगितले जाते. तसंच ज्या लोकांना अर्थराइटिसचा त्रास असतो त्यांनी नियमित हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने, त्यांना या समस्येपासून कायमची मुक्ती मिळू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमके हळदीचे दूध बनवायचे कसे ज्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हळदीचे दुध बनवण्याची प्रोसेस.

हळदीचे दूध कसे बनवावे

मित्रांनो सिजर हळदीचे दुधात काळीमिरी टाकली नाही तर त्याचा फायदा आपल्या शरीराला पोहोचत नाही. असे सांगितले जाते की, हळदीत असलेले कर्क्युमिन नावाचा घटक आपल्या शरीराला तेव्हाच उपयोगाचा पडतो जेव्हा त्यात काळी मिरी मिक्स केली जाते, म्हणुन हळदीचे दूध बनवताना नेहमी काळीमिरी त्यात टाकली गेली पाहिजे. त्यामुळे हळदीचे दुध बनवण्यासाठी अर्धा कप कोमट दुधात थोडीशी हळद आणि चिमूटभर काळी मिरी पावडर घातली पाहिजे. जर आपणांस हे पिता येणे शक्य नसेल तर आपण यात गूळ घालू शकता तसेच तुम्ही गूळऐवजी साखर देखील यात घालू शकता. पण गूळ हिवाळ्यात फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते आणि साखरेपेक्षा आरोग्यदायी मानला जातो, त्यामुळे गूळ टाकावा. तुमच्याकडे कच्ची हळद म्हणजे खांडी हळद असेल तर दूध गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा आणि त्यात खांडी हळद घाला. सुरुवातीला चव आवडणार नाही पण हळूहळू सवय होईल, हे दूध अधिक चविष्ट बनवण्यासाठी आपण दुध गरम करताना त्यात वेलची घालू शकता.

English Summary: benifits of turmeric milk for human body
Published on: 23 December 2021, 07:11 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)