देशात सर्वत्र हिवाळ्याची चाहूल जाणवायला लागली आहे, राज्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. असे सांगितले जाते की हिवाळ्यात मनुका खाल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात. विशेषता मनुक्याचे दुधात टाकून सेवन केल्याने यापासून शरीराला विशेष लाभ प्राप्त होत असतो. हो मित्रांनो मनुका दुधात टाकून पिल्याने खरच आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. मनुका एक थंड पदार्थ आहे, यात कॅटेचिन्स नावाचे अँटी-ऑक्सिडंट आणि केम्पफेरॉल नावाचे फ्लेव्होनॉइड असते, जे कोलन ट्यूमरची वाढ कमी करण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, यात पॉलिफेनोलिक, फायटोन्यूट्रिएंट्स देखील असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. मित्रांनो मनुक्यामध्ये असलेले पोषक घटक मानवी शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी पडत असतात. आज आपण मनुके खाण्याचे मानवी शरीराला नेमके कुठले फायदे होतात आणि म्हणून त्याचे सेवन नेमके कसे करावे याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी.
मनुका खाण्याचे फायदे
दृष्टी वाढवण्यासाठी उपयुक्त: मनुक्यामध्ये असलेले पोषक घटक डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेष कारगर सिद्ध होत असल्याचा दावा केला जातो. तज्ञांच्या मते, मनुक्यात पॉलीफेनॉलिक नामक फाइटोकेमिकल मोठ्या प्रमाणात आढळते आणि हे फायटोकेमिकल्स आपले डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच यामुळे डोळ्यांची दृष्टी वाढण्यास फायदा पोहोचत असतो. मनूक्यामध्ये असलेले अन्य पोषकतत्वे आणि अँटिऑक्सिडंट डोळ्याचे अन्य विकार जसे की रातांधळेपणा, काचबिंदू आणि मोतीबिंदू इत्यादी आजारांपासून डोळ्यांचे संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे नियमित मनुक्याचे सेवन करण्याचा आहार तज्ञ देखील सल्ला देत असतात.
हृदय तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते: मनुक्याचे नियमित सेवन केल्याने हृदयासंबंधित अनेक विकार दूर केले जाऊ शकतात तसेच यामुळे हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. मित्रांनो आहार तज्ञांच्या मते मनुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम नामक खनिज आढळते जे की मानवी हृदयाला स्वस्त ठेवण्यास मदत करते आणि यामुळे हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. पोटॅशियम नामक घटक कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्याचा देखील मदत करते त्यामुळे मनुक्याचे सेवन केल्याने हृदयासंबंधित अनेक विकार दूर केले जाऊ शकतात.
लैंगिक दुर्बलता दूर करण्यासाठी: मनुक्याचे सेवन पुरुषांसाठी विशेष फायदेशीर असल्याचा दावा केला जातो. असं सांगितलं जातं की, मनुक्यामध्ये असलेले अमिनो ऍसिड लैंगिक दुर्बलता दूर करण्यास सक्षम असते. पुरुषांना जर लैंगिक दुर्बलता असेल तर अशा पुरुषांनी रोज रात्री झोपण्यापूर्वी 8 ते 10 मनुके एका ग्लास दुधात चांगली उकळून थंड करून त्याचे सेवन केले पाहिजे. फक्त लैंगिक दुर्बलता असलेल्या व्यक्तीने त्याचे सेवन करावे असे नाही याचे सेवन कोणीही करू शकतो यामुळे लैंगिक दुर्बलता सारखा विकार कोनाला होऊ शकत नाही. तसेच यामुळे मानवी शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता देखील कमालीची वाढते म्हणून नियमित मनुक्याचे सेवन करणे प्रत्येकासाठी फायदेशीर ठरू शकते.
Disclaimer: Krishi Jagran Marathi या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची पुष्टी करत नाही. या फक्त सूचना म्हणून घ्या. असा कोणताही उपचार/औषध/आहार करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.
Published on: 14 January 2022, 12:06 IST