तुम्हाला बदाम खायला आवडतो ना? मग किशमिश देखील खायला आवड असेल. आणि आपणास बदाम व किसमिस खाण्याचे फायदे देखील माहित असतील. आपण बदाम व किशमिश वेगवेगळे खाल्ले असतील पण आज आम्ही आपणांस भिजवलेले बदाम आणि भिजवलेले किशमिश एकत्रित खाण्याचे फायदे सांगणार आहोत. भिजवलेले बदाम आणि भिजवलेले किशमिश सकाळी सकाळी खाल्ल्याने आपल्या शरीराला याचा खुप आश्चर्यकारक फायदा होतो. हेल्थ एक्स्पर्ट याविषयीं अनेक महत्वपूर्ण माहिती सांगतात असेच प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर दिक्षा भावसार यांनी आपल्या इंस्टाग्राम आयडी वर याविषयी माहिती सांगितली आहे. हिच माहिती आज आपण जाणुन घेऊया.
डॉक्टरांच्या मते सकाळचा नाश्ता आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवतो. त्यामुळे पोषक तत्त्वांनी भरपूर बदाम आणि किशमिश यांचे सकाळचा नाष्टा च्या वेळेस सेवन केले पाहिजे. बदाम किसमिस मध्ये प्रोटीन मॅग्नेशियम मॅग्नीज फायबर इत्यादी पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. डॉक्टरांच्या मते बादाम किस्मिस असेच खाण्यापेक्षा भिजवून खाल्ल्याने याचा फायदा आपल्या शरीराला जास्त मिळतो. भिजवलेले बदाम भिजवलेले किसमिस एकत्रपणे सकाळी खाल्ल्याने श्री स्त्रीयांना येणाऱ्या पीरियड्स मधील वेदना कमी होतात, तसंच सकाळी सकाळी सेवन केल्याने भूक लागत नाही, आपल्या शरीराला बऱ्याच वेळेपर्यंत ऊर्जा मिळत राहते.
भिजवलेले बदाम आणि किशमिश खाल्ल्याने हे होतात जबराट फायदे
- भिजवलेले बदाम आणि बेदाणे अर्थात किशमिश सकाळी एकत्रपणे खाल्ल्याने दिवसभर शरीराला ऊर्जा मिळत राहते. यामुळे याचे सेवन अवश्य केले पाहिजे यांच्या सेवणाने कोणतेही काम करताना थकवा जाणवत नाही, म्हणून जर आपल्याला थकवा जाणवत असेल तर बदाम आणि किस्मिस याचे एकत्रित सेवन करा.
- नाश्त्यात भिजवलेले बदाम आणि भिजवलेले मनुके म्हणजे किशमिश एकत्र खाल्ल्याने पचन सुधारते, आणि जर पाचन व्यवस्थित होत असेल तर त्यामुळे अॅसिडिटीची समस्याही दूर होते. म्हणुन ज्या व्यक्तींना पाचन विषयी तक्रार असते किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो त्या व्यक्तींनी भिजवलेले बदाम आणि किशमिश याचे सेवन करावे.
- असे सांगितलं जात की, भिजवलेले बदाम आणि भिजवलेले मनुके एकत्र खाल्ल्याने मेंदू तंदुरुस्त राहतो, तसेच त्यामुळे मनाचे आरोग्य देखील चांगले राहते. शिवाय यांच्या सेवणाने स्मरणशक्तीही चांगली सुधारते. त्यामुळे याचे सेवन हे प्रत्येकाने केले पाहिजे.
Published on: 21 December 2021, 09:27 IST