Health

आपल्या सनातन हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते, म्हणून तुळशीची पूजा देखील केली जाते. तसेच आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे, तुळशीमध्ये असलेले आणि पोषक तत्वे आपल्या मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधात तुळशीचा वापर केला जातो. फार पूर्वीपासून तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक आजारांपासून निदान मिळवण्यासाठी केला जात आहे.

Updated on 26 December, 2021 5:38 PM IST

आपल्या सनातन हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते, म्हणून तुळशीची पूजा देखील केली जाते. तसेच आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे, तुळशीमध्ये असलेले आणि पोषक तत्वे आपल्या मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्यामुळे अनेक आयुर्वेदिक औषधात तुळशीचा वापर केला जातो. फार पूर्वीपासून तुळशीच्या पानांचा उपयोग अनेक आजारांपासून निदान मिळवण्यासाठी केला जात आहे.

आज देखील सर्दी खोकला अशा इत्यादी आजारात तुळशीच्या पानांचा काढा पिण्याची शिफारस जुने लोक करताना दिसतात. फक्त तुळशीचे पानेच गुणकारी आहेत असे नाही तुळशीच्या बिया देखील खूपच गुणकारी असतात, तुळशीच्या बियांमध्ये देखील अनेक पोषक घटक उपलब्ध असतात, जे की आपल्या शरीरासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते. तुळशीच्या बिया आपणास अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतात. अशा गुणकारी तुळशीच्या बियांचे फायदे आज आपण जाणून घेणार आहोत, चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी.

तुळशीच्या बियांचे सेवन केल्याने होणारे फायदे

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी- आयुर्वेदिक तज्ञाच्या मते, तुळशीच्या बियांमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फिनोलिक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरतात, यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती लक्षणीय वाढते. शिवाय तुळशीच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
  • सूज कमी करण्यासाठी- जर आपल्या शरीरात कुठल्याही अवयवाला सूज आली असेल, तर अशा परिस्थितीत तुळशीच्या बियांचे सेवन आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुळशीमध्ये तसेच तुळशीच्या बियांमध्ये anti-inflammatory गुणधर्म भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे तुळशीच्या बियाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील एडिमाची समस्या मुळापासून नष्ट होऊ शकते.
  • ताण-तणाव दूर ठेवण्यास मदत करते- अलीकडे अनेक लोकांना कामामुळे मानसिक ताण वाढताना दिसत आहे, कोरोना नामक महाभयंकर आजारापासून ही समस्या तर अजूनच जास्त आपले पाय पसरविताना दिसत आहे. जर आपणासही अशा प्रकारची समस्या असेल तर आपण तुळशीच्या बियांचे सेवन करून या समस्यांपासून मुक्ती मिळवू शकता. तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने थकवा दूर होतो.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: benifits of basil seed to human body
Published on: 26 December 2021, 05:38 IST