Health

शेळी म्हटले म्हणजे कमी खर्चिक आणि काटक विविध प्रकारच्या झाड पालांवर आपली उपजीविका करणारा तसेच कमी खर्चात शेळी पालकाला चांगले उत्पन्न मिळवून देणारा प्राणी आहे. त्यातल्या त्यात शेळीचे दूध हे पचायला हलके असल्यामुळे एक सकस आहार आणि आहार मूल्याच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाते. जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपल्या भारतात शेळीच्या जवळ जवळ 27 प्रकारच्या जाती आढळून येतात.

Updated on 24 August, 2021 12:33 PM IST

शेळी म्हटले म्हणजे कमी खर्चिक आणि काटक विविध प्रकारच्या झाड पालांवर आपली उपजीविका करणारा तसेच कमी खर्चात शेळी पालकाला चांगले उत्पन्न मिळवून देणारा प्राणी आहे. त्यातल्या त्यात शेळीचे दूध हे पचायला हलके असल्यामुळे एक सकस आहार आणि आहार मूल्याच्या दृष्टीने महत्वाचे समजले जाते. जर आपल्या भारत देशाचा विचार केला तर आपल्या भारतात  शेळीच्या जवळ जवळ 27 प्रकारच्या जाती आढळून येतात.

 यामधील देशी शेळी एका वेता मध्ये जवळजवळ 60 लिटर दूध देते. जर सानेन सारख्या विदेशी जातीपासून संकर केलेली शेळी एका वेतात 300 लिटर दूध देते.या लेखामध्ये आपण शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

शेळीच्या दुधाचे आरोग्यदायी फायदे

  • शेळीचेदूधपचण्यासहलकेअसतेयाचेमहत्वाचेकारणम्हणजेयामध्येस्निग्धपदार्थांच्याकणांचासूक्ष्मआकार हे होय.
  • शेळीच्या दुधामध्ये शरीराला घातक अशा सूक्ष्मजंतूंचा नाश करणारे घटक अधिक असतात.
  • शेळीच्या दुधामध्ये नऊ ते दहा प्रकारची खनिजे आहेत. त्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या खनिजांची कमतरता कमी होण्यास चांगल्या प्रकारे मदत होते.
  • जर दररोज एक ग्लास  शेळीचे दूध पिले तर आतड्यांना असलेली सूज कमी होते.
  • शरीरातील कॅल्शियम कमतरता भरून काढण्याचे काम शेळीचे दूध करते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.
  • शेळीच्या दुधामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात असल्यामुळे हे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
  • शेळीच्या दुधात प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शरीराचा विकास होतो त्यामुळे लहान मुलांना शेळीचे दूध प्यायला देणे आवश्यक असते.
  • आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी शेळीचे दूध फायदेशीर आहे.यामुळे कोलेस्टरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे हार्टअटॅक, स्ट्रोक्स या समस्यांचा त्रास रोखण्यासाठी शेळीचे दूध महत्त्वाचे ठरते.
  • शेळीच्या दुधात पोटॅशियम हा घटक मुबलक असल्याने रक्तदाब आटोक्यात राहण्यास मदत होते.
English Summary: benifit of the goat milk to health
Published on: 24 August 2021, 12:33 IST