Health

शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात.

Updated on 20 September, 2020 3:03 PM IST


शेंगदाण्यांमध्ये काजू प्रमाणेच आरोग्यदायी गुण आढळून येतात. प्रोटीनचा सर्वात स्वस्त वनस्पती स्त्रोत म्हणून शेंगदाण्याकडे पाहिले जाते. आपण जर एक मूठभर शेंगदाणे खाल्ले तर त्यापासून ४२६ कॅलरीज, पाच ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि १७ ग्राम प्रोटीन असतात. शेंगदाणा पासून विविध प्रकारचे विटामिन सुद्धा मिळतात जसे की, इ, क, आणि बी इत्यादी.

  काय आहेत शेंगदाणा खाण्याचे फायदे

 जर आपल्याला खोकला येत असेल तर शेंगदाणा उपयुक्त अशा औषधाचे काम करते. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. तसेच काही लोकांना भूक न लागण्याची समस्या असते ती दूर होते.दुसरे म्हणजे गर्भवती स्त्रियांसाठी शेंगदाण्याचे सेवन अतिशय फायद्याचे असते. गर्भावस्थेत असलेल्या बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फार फायद्याचे असते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा ६ फॅट्स सुद्धा भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. त्वचेच्या सर्वांगीण विकासासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे शेंगदाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

साधारणतः जेवण झाल्यानंतर जर आपण पन्नास ग्रॅम शेंगदाणे दररोज खाल्ल्यास तब्येत चांगली बनते आणि रक्ताची कमतरता भासत नाही. आठवड्यातून कमीत-कमी तीन ते चार दिवस शेंगदाण्याचे सेवन केले तर हृदयविकार होण्याच्या संभव कमी होतो. रक्तातील वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. लीपो प्रोटीन नावाच्या कोलेस्ट्रॉलची मात्रा जवळजवळ ७.४ टक्के घटते. प्रोटीन, फायबर, विटामिन आणि एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असते. त्याचाही त्वचेसाठी फायदा होतो. महिला आणि पुरुषांमधील हार्मोन्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी दररोज थोडसे शेंगदाणे खाणे फायद्याचे असते. शेंगदाण्यांमध्ये तेलाचे प्रमाण असल्यामुळे पोटाचे विकार नाहीसे होतात. शेंगदाण्याच्या नियमित सेवनाने ऍसिडिटी आणि गॅसपासून मुक्तता मिळते. अशा या गरिबाचे बदाम म्हटल्या गेलेल्या शेंगदाण्याचे सेवन जर आपण नियमितपणे केले किंवा वरती सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून तीनदा जरी खाल्लेत तरी आरोग्यासाठी याचा भरपूर फायदा होतो.

English Summary: Benefits of Peanuts: Improves digestion and increases appetite
Published on: 20 September 2020, 03:02 IST