ऋतुमानातल्या बदलामुळे रोगराई पसरते हे जरी खरं असलं , तरी निसर्ग मात्र त्यावरील ' औषध'सुद्धा आपणास देत असतो . पावसाळी हवामानात वाढणारया निरनिराळ्या पालेभाज्या व रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत . गरज आहे ती त्या योग्य प्रकारे आहारात समाविष्ट करून घेण्याची. आरोग्याला पोषक असणारया अशाच काही भाज्यांची आपण ओळख करून घेऊ.ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो त्याची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. या भाज्याही उकडून शिजवल्या जातात.
करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुननवर्वा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वागोटी, टाकळा, आंबाडी, खडकतेरी, भोवरी यासारख्या भाज्यांमध्ये जस्त (झिंक), तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते. रानकेळी हा खोकल्यावर रामबाण उपाय आहे.
हे ही वाचा- बापरे दरवर्षी कावीळ मुळे होतोय तब्बल 14 लाख लोकांचा मृत्यु
काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते.
त्यामुळे आपण शक्यतो रानभाज्याची ओळख पटवूनच आहारात समाविष्ट करून घ्यावी. या भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढवलेल्या असतात त्यामुळे त्यात खतेही वापरलेली नसतात. उकडून भाज्या केल्यानंतरही त्यातील गुणधर्म कमी होत नाही. उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले वा तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
त्यामुळे प्रत्येकाने मोसमी रानभाज्या आहारात घ्याव्यात.
आता आपल्या मनात प्रश असेल की भाज्या कुठं मिळणार व कश्या बनवायच्या तर आपल्या साठी आरोग्यनिती च्या माध्यमातून रानभाज्यांची ओळख पटावी व त्याचा वापर कसा करावा याचे व्हिडीओ खालील लिंक वर पाहिला मिळतील. तर आपण ते व्हिडीओ पाहून व समजून रानभाज्या आहारात समाविष्ट करू शकता.
पावसाळी हवामानात वाढणारया निरनिराळ्या पालेभाज्या व रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत . गरज आहे ती त्या योग्य प्रकारे आहारात समाविष्ट करून घेण्याची.
Nutritionist & Dietitian
Naturopathis
Amit Bhorkar
whats app: 9673797495
Published on: 27 April 2022, 07:21 IST