आपल्याकडे मुलांना रोज बाळगुटी देण्याची पद्धत आहे.बाळाची प्रतिकारशक्ती उत्तम राखण्यासाठी,पचनशक्ती सुधारून अनेक आजारांवर/शारीरिक तक्रारींवर घरीच उपाय करण्यासाठी व बाळाची शारीरिक व मानसिक वाढ व्यवस्थित होण्यासाठी पूर्वापार चालत आलेली अशी ही घरगुती चिकित्सा पद्धती आहे.
बाळगुटीमध्ये खालील औषधांचा समावेश होतो.Baguti includes the following medicines.मुरुडशेंग - ही १ पोटातील मुरडा कमी करणारी, कृमी कमी करणारी वनस्पती आहे. पोट दुखून, पातळ, फेसकट मलप्रवृत्ती कमी करणारी वनस्पती आहे.हिरडा: याने यकृताचे कार्य सुधारून पचनशक्ती सुधारते. पोटात वात झाल्यास, पोट फुगले असता, पोट रोज साफ होण्यास याचा उपयोग होतो.पिंपळी:श्वसनसंस्था व पचन संस्था उत्तम राखणारे
असे हे औषध आहे. सर्दी, खोकला, अजीर्ण यावर उपयोगी आहे.जायफळ: हे मुलाला झोप येत नसल्यास, शांत झोप लागण्यासाठी पातळ शौचास होत असल्यास 3- 4 वेढे इतकेच द्यावे. वेखंड: मुलांची स्मरणशक्ती, मेधा, बुध्दी,आकलनशक्ती वाढविण्यासाठी रोज द्या. याच्या सेवनाने सर्दी, खोकला, कृमी कमी होतात. हे तीक्ष्ण असते त्यामुळे 4-5 वेढेच द्या.बेहडा - सर्दी,खोकला,जुलाब कमी होण्यासाठी उपयुक्त.
ज्येष्ठमध:आवाजाला गोडवा येण्यासाठी, कफ कमी करण्यासाठी, वर्ण उजळ करण्यासाठी व उष्णता कमी करण्यासाठी रोज गुटी मधून द्या.नागरमोथा - कृमी कमी करण्यासाठी, लघवीचा त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.काकदशिंगी: उचकी, सर्दी, खोकला, उलटी, जुलाब, ताप, दात येत असताना होणारा त्रास कमी करण्यासाठी रोज गुटी मधून द्या.
हळकुंड:रक्तशुद्धी करण्यासाठी, कफ, सर्दी, ताप, खोकला कमी करण्यासाठी, वर्ण उजळ करण्यासाठी व जंत कमी करण्यासाठी रोज द्या.कायफल:स्वर सुधारण्या साठी व सर्दी, खोकला कमी करण्यासाठी उपयोगी.मायफल - उलटी, जुलाब कमी करण्यासाठी रोज द्या.सागरगोटे - जंत कमी करण्यासाठी, पोट फुगणे, दुखणे कमी करण्यासाठी रोज द्या.
डिकेमाली :दात येत असताना होणारे सर्व त्रास कमी करण्यासाठी द्या.वावडिंग: उत्तम कृमिनाशक व बाळाची सर्वांगीण वाढ व्यवस्थित करण्यासाठी म्हणजे पचन सुधारणे, रक्त शुद्ध करणे यासाठी रोज द्या.सुंठ:पोट दुखणे, सर्दी, ताप, खोकला, डोके दुखणे, जुलाब, उलटी कमी करण्यासाठी रोज द्या.बदाम:पौष्टीक, बुध्दीवर्धक म्हणून रोज द्या.
खारीक :शरीराची ताकत वाढविण्यासाठी, हाडे बळकट करण्यासाठी पोषक म्हणून रोज द्या.सुके खोबरे: हाडे बळकट करण्यासाठी, पोषक, केस व वर्ण सुधारण्यासाठी रोज द्या.वरील सर्व औषधी,आईच्या दुधामध्ये, मधात किंवा सुवर्ण सिद्ध जलामध्ये उगाळून द्या. बाळास 35 दिवसांपासून ते 2 वर्षांपर्यंत गुटी द्या.
रोज सहाण व सर्व औषधी स्वच्छ ऊकळलेल्या पाण्यामध्ये धुऊन, चांगल्या स्वच्छ पांढऱ्या सुती कपड्याने पुसून ठेवा. गुटी तयार करण्याआधी आपले हात स्वच्छ साबणाने धुवा. गुटी देण्याची वेळ शक्यतो एकच ठेवा.बाळाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला रोज गुटी द्यावी.
संकलन- निसर्ग उपचार तज्ञ
डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.
आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक
संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९
Published on: 14 August 2022, 05:33 IST