Health

अनेकवेळा असे घडते की, काही कारणांनी तासनतास लघवीला जाणे जमत नाही, परंतु लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. असे झाल्यास युरिन इन्फेक्शनचा धोका दुपटीने वाढू शकतो असे तज्ञ वारंवार सांगत असतात. त्यामुळे जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे योग्य नाही.

Updated on 08 May, 2022 3:29 PM IST

अनेकवेळा असे घडते की, काही कारणांनी तासनतास लघवीला जाणे जमत नाही, परंतु लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. असे झाल्यास युरिन इन्फेक्शनचा धोका दुपटीने वाढू शकतो असे तज्ञ वारंवार सांगत असतात. त्यामुळे जास्त वेळ लघवी रोखून ठेवणे योग्य नाही. तुम्हीही लघवीला बराच वेळ अडवून बसत असाल तर जाणून घ्या कोणते नुकसान तुम्हाला सहन करावे लागू शकतात.

किडनीची समस्या उद्भवू शकते

जर तुम्ही जास्त वेळ लघवी रोखून ठेवत असाल तर अशा स्थितीत किडनीचे आरोग्य मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकते. याशिवाय यामुळे संसर्गाचा धोका देखील वाढतो, ज्यामुळे जळजळ होण्याची समस्या देखील उद्भवू शकते.  लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने किडनी आणि जवळच्या अवयवांवर दबाव येतो. हा दाब वाढल्यास किडनीच्या आजाराचा धोका वाढतो. त्यामुळे लघवी जास्त वेळ रोखून ठेऊ नये असा सल्ला दिला जातो.

UTI संसर्गाचा धोका वाढू शकतो

लघवी जास्त वेळ रोखून ठेवल्याने UTI चा धोका वाढू शकतो, कारण शरीरात असलेले बॅक्टेरिया लघवी करताना सहज निघून जातात, तर त्यांना जास्त वेळ दाबून ठेवल्याने त्यांची संख्या शरीरात वाढण्याचा धोका वाढतो. त्याचा सर्वाधिक परिणाम मूत्रपिंडाच्या आरोग्यावर होतो, त्यामुळे जास्त वेळ लघवी रोखून धरू नका.

महत्वाच्या बातम्या:

Health: नेहमी वाढतो का ब्लड प्रेशर? मग करा हे योग आणि मिळवा कायमचा आराम

Health News : रात्री हे पदार्थ चुकूनही खाऊ नका; नाहीतर आरोग्य येणार धोक्यात

मूत्र धारणा

लघवी रोखून ठेवल्यामुळे, मूत्राशय पूर्णपणे रिकामे होऊ शकत नाही, यामुळे कधीकधी वेदना आणि अस्वस्थता देखील वाढू शकते, म्हणून जास्त वेळ लघवी रोखून धरू नका.  जेणेकरून तुम्हाला इतर आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

मूत्राशयाला ताण 

जर तुम्ही जास्त वेळ लघवी थांबवत असाल, तर मूत्राशयात ताणण्याची समस्या वाढू शकते, ज्यामुळे काही वेळा लघवी गळतीची समस्या देखील होऊ शकते. त्यामुळे जास्त वेळ लघवी रोखून ठेऊ नका.

पोट दुःखी

जास्त वेळ लघवी रोखून ठेवल्याने पोटदुःखीची समस्या वाढू शकते, कारण जेव्हा असे होते तेव्हा मूत्राशयावर दाब वाढतो ज्यामुळे वेदना देखील होऊ शकतात, तर ही वेदना वाढून मूत्रपिंडापर्यंत देखील पोहोचू शकते. यामुळे वेळीच लघवी करणे अधिक योग्य असते.

English Summary: Be careful! Prolonged urinary retention can have serious health consequences
Published on: 08 May 2022, 03:29 IST