मित्रांनो आहार तज्ञ सांगतात की, निरोगी राहण्यासाठी व्यक्तीने नियमितपणे 10 ते 12 ग्लास पाणी प्यावे. हे जरी शाश्वत सत्य असले तरी देखील चुकीच्या वेळी पाणी पिल्याने मानवी आरोग्याला मोठा धोका पोहचत असतो. मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, काही लोक चुकीच्या वेळी पाण्याचे सेवन करतात, यामुळे शरीराला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावे की नाही, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात येतात. तुमच्याही मनात असा प्रश्न कधी ना कधी आलाच असेल. मग आजचा हा लेख खास तुमच्यासाठी याचं विषयावर बनवला आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आपण जेवण केल्यानंतर किती पाणी प्यावे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती याविषयीं सांगणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी.
हेही वाचा:-जंगल जलेबी फळाचे फायदे तोटे माहित आहेत? वाचून वाटेल आश्चर्य...
जेवण झाल्यावर पाणी प्यावे का? केव्हा पाणी प्यावे
डॉक्टरांच्या मते, जेवण केल्यानंतर लगेचचं पाणी पित असाल तर ही घाणेरडी सवय आजच बंद करा. कारण की आहार तज्ञांनी जेवण केल्या नंतर लागलीच पाणी न पिण्याचा सल्ला दिला आहे. याचे कारण असे की, आपल्या पचनशक्तीच्या अग्नीला अन्न पचायला 3 तास लागतात.
अशा परिस्थितीत जेवणानंतर लगेचच पाणी प्यायल्यास आग लगेच थंड होते आणि पचनसंस्थेच्या कामावर याचा विपरीत परिणाम होतो. अशा स्थितीत व्यक्तीने जेवल्यानंतर 45 ते 60 मिनिटांनी पाणी प्यावे. याशिवाय तुम्ही जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिऊ शकता. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने ब्लोटिंग, अॅसिडीटी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
हेही वाचा:-दूध आरोग्यासाठी आहे फायदेशीर! पण गायीचे का म्हशीचे का दोन्ही? वाचा आणि घ्या माहिती
पाणी पिण्याची योग्य वेळ नेमकी कोणती बर
- जर एखाद्या व्यक्तीने जेवण झाल्यानंतर 1 तासात पाणी पिले तर त्याचे वजन नियंत्रित ठेवता येते. तसेच ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे, त्यांनी जेवणाच्या 1 तासानंतरच पाणी प्यावे.
- जर एखाद्या व्यक्तीने सकाळी उठून दोन ग्लास पाणी प्यायले तर पचनक्रिया मजबूत होऊ शकते.
- सकाळी दोन ग्लास पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया सुधारते.
- जेवणानंतर १ तासाने पाणी प्यायल्याने गॅस आणि •अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो.
- जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी प्यायल्याने अन्नातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातात.
हेही वाचा:-Corona Mask; देशात कोरोना वाढतोय! 'या' राज्यांमध्ये पुन्हा मास्क केला बंधनकारक..
Published on: 24 April 2022, 10:46 IST