Corona : देशात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. काही महिन्यांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली होती मात्र आता पुन्हा एकदा देशात हळूहळू कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोरोनाच्या आकडेवारीवरून कालच्यापेक्षा आज कोरोनाचे रुग्ण अधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या 24 तासात देशभरात जवळजवळ 2 हजार 364 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात काल 1 हजार 829 कोरोना रुग्णांची नोंद होती. आज मात्र या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसत आहे. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ही 15 हजार 419 वर गेली आहे. देशात सध्या कोरोनाच्या (Coronvirus) सक्रिय रुग्णांची संख्या ही जवळपास 15 हजार 419 वर पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत होती मात्र आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे.
त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळणे आता गरजेचं झाले आहे. कारण कोरोनाची पुढील लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना बघायला मिळाली. गेले काही दिवस कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वांना दिलासा मिळाला होता. मात्र आजच्या आकडेवारीवरून तिचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे.
LPG Price Hike : आता सर्वसामान्यांनी जगायचे कसे..! गॅस सिलेंडर झाला हजाराच्या पार
आतापर्यंत भारतात कोरोनाबाधितांची एकूण रुग्णसंख्या ही 4 कोटी 31 लाख 29 हजार 563 वर गेली आहे, तर मृतांची संख्या ही 5 लाख 24 हजार 303 वर पोहचली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी लसीकरण प्रक्रिया जलदगतीने सुरु करण्यात आली आहे. सध्या लोकांना बूस्टर डोस देण्यावरही भर देण्यात येत आहे.
IMD Monsoon News : पुढील चार दिवस महत्वाचे; 'या' भागात होणार जोरदार पावसाचे आगमन
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोक बूस्टर डोस घेण्यास पात्र आहेत. यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर 9 महिन्यांनंतर तुम्ही बूस्टर डोस घेऊ शकता. असे या सूचनांमध्ये सांगण्यात आले आहे. तसेच सरकार दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतरदेखील कमी करू शकतात. असे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णसंख्येत थोडीफार वाढ झाल्याचं दिसून येत आहे. राज्यात काल 300 हून अधिक रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली आहे. त्यात काल 307 नवीन रुग्णांची भर पडली असून 252 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासामध्ये राज्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला त्यामुळे राज्याचा मृत्यूदर आता 1.87% इतका झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
Electricity Bill: या महावितरणाचे करायचे तरी काय! ना खांब, ना कनेक्शन तरी आले एक लाखाचे बिल
Published on: 19 May 2022, 02:09 IST