Health

केळी (Banana) आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे आणि अनेक लोक नाश्ता म्हणून याचे सेवन दररोज करतात. हे एक सुपरफूड आहे जे अनेक आजारासोबत लढण्यास मदत करते. केळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या पैकी बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर त्याचे छिलके (peels) दूर फेकून देतात.

Updated on 19 May, 2021 9:10 PM IST

केळी (Banana) आपल्याला वर्षभर सहज उपलब्ध असणारे फळ आहे आणि अनेक लोक नाश्ता म्हणून याचे सेवन दररोज करतात. हे एक सुपरफूड आहे जे अनेक आजारासोबत लढण्यास मदत करते. केळ आपल्या आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. आपल्या पैकी बहुतेक लोक केळी खाल्ल्यानंतर त्याचे छिलके (peels) दूर फेकून देतात.

पण काय आपल्याला माहीत आहे जे छिलके आपण फेकून देतो ते आपल्यासाठी किती फायदेशीर आहेत. केळीच्या छिलक्यात म्हणजेच साली(peels) मध्ये एंटीऑक्सीडेंट्स, फंगसरोधी, जिवाणूरोधी आणि एंजाइम चे गुण आढळतात. त्याच सोबत यामध्ये व्हिटामिन बी 6, बी 12, मैग्निशियम आणि पोटेशियम भरपूर प्रमाणात असते. हे सगळे पोषक तत्व आपली सुंदरता वाढवण्यास आपली मदत करतात.

◆केळ्याच्या छिलक्यांचे पुढील प्रमाणे फायदे आहेत

केळी जेवढी आरोग्यासाठी फायदेशीर असतात किंबहुना त्यापेक्षा जास्त फायदेशीर त्याची छिलके असतात त्यामुळे भारतातील काही राज्यातील लोक केळी साली सकट खातात. तसेच केळ्याच्या सालीचे काही पदार्थ बनवून त्यांचे सेवन करतात. चला तर जाणून घेऊ केळीच्या सालीचे म्हणजेच छिलक्यांचे फायदे काय आहेत.

●दातांसाठी फायदेशीर

आपण जर आपल्या पिवळ्या दातांमुळे (yellow teeth) त्रस्त असाल तर मोत्या सारखे पांढरे दात पाहिजे असतील तर केळीचे छिलके फेकू नका. केळीच्या छिलक्यात सिट्रिक एसिड असते ज्याच्या वापराने आपण आपले पिवळे दात मोत्या सारखे पांढरे चमकदार करू शकता.त्यासाठी केळीच्या छिलक्याचा पांढरा भाग काही वेळ पिवळ्या दातांवर रगडा. त्यानंतर आपले दात टूथपेस्ट ने स्वच्छ करा. काही आठवडे असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.

 

●त्वचेवरील म्हससाठी

जर आपण त्वचेवरील म्हस ने वैतागले असाल तर केळीच्या छिलक्याचा वापर करा. केळ्याच्या छिलक्यात असलेले अँटीऑक्सीडेंट आणि एंजाइम म्हस पासून सुटका देण्यात आपली मदत करतात. त्यासाठी आपण केळीचे छिलके म्हस वर बांधून त्या पट्टीला रात्रभर ठेवा आणि सकाळी काढा. काही आठवड्यात आपल्याला म्हस पासून सुटका मिळेल.

●मुरुमे दूर करण्यासाठी

केळ्याचे छिलके मुरुमांचा उपचार करण्यासाठी चांगले असते. केळ्यामध्ये अँटीऑक्सीडेंटची शक्ती असते. हे मुरुमांना निर्माण करण्यासाठी मदत करणाऱ्या घटकांशी मुकाबला करते. यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात जे त्वचेची सूज कमी करण्यास मदत करते. त्यासाठी सगळ्यात पहिले आपण त्वचा थंड पाण्याने धुवा, नंतर स्वच्छ टॉवेल ने त्वचा कोरडी करा. त्यानंतर केळीच्या छिलक्याच्या पांढऱ्या भागाने पाच मिनिट मालिश करा. आता आपण 20 मिनिटांनी आपली त्वचा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. असे दररोज 2 ते 3 वेळा करा. यामुळे आपल्याला मुरुमांपासून सुटका मिळेल.

●जर आपण केल्याच्या छिलक्या सोबत हळद पावडर मिक्स करून पाच मिनिट मालिश करा, नंतर 15 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. असे दररोज 2 वेळा केल्याने त्वचेला मुरुमांपासून सुटका मिळेल.

●खाज-खुजली पासून सुटका

मच्छर चावल्याने किंवा किडा चावल्याने खाज येते. केळ्याच्या छिलक्यात पॉलिसेचराईड असते जे त्वचेमधून सूज आणि श्राव दूर करतो. यासाठी खाज येत असलेल्या जागी छिलके पाच मिनिट मालिश करा. नंतर 20 मिनिटांनी त्वचा थंड पाण्याने धुवा. आवश्यकता वाटल्यास पुन्हा हा उपाय करू शकता.

संकलन: नितीन जाधव
स्रोत:- सौंदर्य उपचार
९१९०८२५५६६९४
प्रतिनिधी - गोपाल उगले

English Summary: Banana peels will turn yellow teeth white
Published on: 19 May 2021, 09:10 IST