आपण आपल्या दैनंदिन आहारात केळीचा अवश्य समावेश करत असतो, आपणास केळी मध्ये असलेले औषधी गुणधर्मांची माहिती देखील असेलच. पण तुम्हाला केळीची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे याविषयी सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. मात्र केळीची साल आपल्या आरोग्यासाठी विशेष फायदेशीर आहे म्हणून केळी खाल्ल्यानंतर कधीच केळीची साल फेकून देऊ नका. ज्या प्रकारे केळीचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे अगदी तसेच केळीचे साल देखील आपल्या शरीरासाठी आश्चर्यकारक फायदे पोचवत असते. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
केळीच्या सालीत अनेक औषधी गुणधर्म आहेत, यामध्ये कर्ब मोठ्या प्रमाणात आढळतो. केळीच्या सालीत व्हिटॅमिन ए, बी6, व्हिटॅमिन बी12, मॅग्नेशियम, पोटॅशियम, मॅंगनीज, जे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते हे देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. एवढेच नाही केळीच्या सालीत फायबरचे प्रमाणही चांगले असते, जे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करते.
केळीच्या सालीचे आश्चर्यकारक फायदे- पुरळसाठी रामबाण उपाय- तज्ञांच्या मते, केळ्याच्या सालीमध्ये अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात, केळीच्या सालीमध्ये असणारे हे गुणधर्म मुरुमांना अर्थात पुरळला कारणीभूत असलेल्या जीवाणूंचा नाश करून त्वचेला पुनरुज्जीवित करण्याचे कार्य करत असते. यासाठी तुम्ही केळीची साल बारीक करून फेस पॅक म्हणुन चेहऱ्याला लावू शकता किंवा तुम्ही प्रभावित त्वचेवर केळीची साल डायरेक्ट रगडू शकता.
बद्धकोष्ठता आणि डायबिटीस साठी आहे विशेष फायदेशीर- मित्रांनो जर आपणांस बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर आपण केळीची साल सेवन करू शकता. यामध्ये असलेले विरघळणारे फायबर बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. याशिवाय केळीची साल तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. एवढेच नाही तर अनेक रिपोर्टनुसार, केळीच्या सालीमध्ये असलेले फायबर हृदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी करतात आणि मधुमेहाचा त्रास असेल तर तो देखील कमी करण्यास केळीची साल मदत करत असते.
चेहऱ्यावरील सुरकुत्या दुर करण्यास विशेष फायदेशीर- केळीच्या सालीत अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. एवढेच नाही हे गुणधर्म चेहऱ्यावर असलेल्या सुरकुत्या दूर करण्यासाठी देखील रामबाण असल्याचे नमूद केले जाते. यामुळे केळीच्या सालीचे गुणधर्म सुरकुत्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. जर आपणास त्वचेसंबंधित या समस्या असतील तर आपण केळीची साल वापरात आणू शकता.
Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.
Published on: 05 March 2022, 02:37 IST