Health

हिवाळ्यात फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरते. केळीचे देखील हिवाळ्यात सेवन केल्याने आपल्या आरोग्याला खूप चांगला फायदा मिळतो. जय एक बहुवार्षिक फळ आहे व ते संपूर्ण वर्षभर बाजारात उपलब्ध असते, पण अनेक जन थंडीमुळे केळी खाने बंद करतात. परंतु आम्ही आपणास सांगू इच्छितो की, थंडीत केळीचे सेवन करणे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. केळी मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, केळीत मुख्यता विटामिन, फायबर, पोटॅशियम आणि मॅग्नीज सारखे पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून आम्ही आज आपणास थंडीत केळी खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

Updated on 17 December, 2021 4:25 PM IST

हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करते- केळी मध्ये पोटॅशियम नावाचा घटक मोठ्या प्रमाणात असतो. पोटॅशियम हे आपल्या हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते यामुळे आपले हाय ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.म्हणून हिवाळ्यात केळीचे सेवन करणे हे आरोग्यासाठी उत्तम असते.

विटामिन सी ची कमतरता दूर करण्यास उपयोगी- केळी मध्ये विटामिन सी चे प्रमाण हे लक्षणीय असते. त्यामुळे त्या लोकांना विटामिन सी ची कमतरता असते त्यांनी केळीचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. असे सांगितले जाते की हिवाळ्यात दररोज एक केळीचे सेवन केले तर विटामिन सी ची कमतरता कमी केली जाऊ शकते.

त्वचेसाठी उपयोगी- केळीमध्ये मॅग्नीज मोठ्या प्रमाणात आढळते. मॅग्नीज आपल्या स्किनला ग्लो आणण्यासाठी उपयोगी ठरते. नेहमीच शरीरात कोलेजन नावाचा घटक तयार करण्यास मदत करते, त्यामुळे हिवाळ्यात केळीचे सेवन केल्याने रिंकल्स फ्री स्किन प्राप्त होते.

व्हिटॅमिन बी 6- केळी मध्ये अनेक विटामिन असतात, त्यापैकीच एक असते विटामिन बी 6, विटामिन बी 6 हे आपल्या शरीरातील रेड ब्लड सेल वाढवण्यास मदत करते. त्यामुळे केळी खाल्ल्याने आपले शरीर हे स्वस्थ राहते. गर्भवती महिलांनी हिवाळ्यात केळीचे सेवन केले पाहिजे. 

टीप :- सदर आर्टिकल मध्ये नमूद केलेल्या पद्धती आणि दाव्यांची कृषी जागरण पुष्टी करत नाही. या फक्त सूचना आहेत याचा उपयोग माहिती म्हणुन घ्या. असे टीकोणतेही उपचार/औषध/आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

English Summary: banana benifits eat banana in winter this is very useful for our health
Published on: 17 December 2021, 04:25 IST