भारतात जवळपास प्रत्येक व्यक्ती हा चहा पिऊन आपल्या दिवसाची सुरवात करत असतो, हिवाळ्यात चहा प्रेमी गुळाचा चहा पिणे पसंत करतात. काही चहा प्रेमी दिवसातून कित्येकदा चहाचा अस्वाद घेतात. अनेकांना चहाचे व्यसन जडून जाते जे की आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते
आणि जर आपण हिवाळ्यात अधिक गुळाचा चहा पित असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. गूळ गरम पदार्थ आहे त्यामुळे हिवाळ्यात गुळाचा चहा थंडी घालवण्यासाठी पिला जातो, पण तुम्हाला ठाऊक आहे का गुळाचा चहा अधिक पिल्याने आपल्या शरीराला नुकसान पोहचू शकते.गूळ हा गरम असतो त्यामुळे याचे सेवन हे योग्य प्रमाणातच केले गेले पाहिजे. मित्रांनो आज आपण गुळाच्या चहापासून आरोग्याला काय बाधा पोहचू शकते याविषयीं जाणुन घेणार आहोत.
»वजन वाढू शकते
मित्रांनो गुळात कॅलरी जास्त प्रमाणात असते, त्यामुळे जर तुम्ही हिवाळ्यात गुळाचा चहा जास्त पित असाल तर हा गुळाचा चहा तुमच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो. गुळाचा चहामध्ये असलेल्या कॅलरीज तुमचे वजन वाढवू शकतात. त्यामुळे गुळाचा चहा जर आपण पित असाल तर दिवसभरात तीन कप पेक्षा जास्त गुळाचा चहा पिऊ नये, अन्यथा आपल्या शरीरावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
गुळाचा चहा साखरेच प्रमाण वाढवू शकतो
जास्त गुळाच्या चहाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील साखरेच प्रमाण वाढू शकते. डॉक्टर असे सांगतात की,100 ग्राम गुळात जवळपास 90.7 ग्राम साखर असते. त्यामुळे गुळाच्या चहाचे अधीकचे सेवन आपल्या शरीरातील साखर वाढवू शकते. डायबेटीस असलेल्या व्यक्तींनी गुळाचा चहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
नाकातून रक्त येऊ शकते
गुळाचा चहा जास्त पिल्याने नाकातून रक्त येऊ शकते, ह्याचे मुख्य कारण म्हणजे गूळ हा गरम पदार्थ आहे. त्यामुळे गुळाच्या चहाचे योग्य सेवन करणे महत्वाचे ठरते.
अपचन होऊ शकते
अनेक लोकांची समजूत असते की, गुळाचा चहा हा आरोग्यासाठी फायदेशीर असतो, त्यामुळे लोक दिवसभर गुळाचा चहा पित राहतात. जर आपणही असेच करत असाल तर असे केल्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे गुळाचा चहा हा कमी प्रमाणात घेतला पाहिजे. अन्यथा आपणांस अपचन, गॅस प्रॉब्लेम, पोट साफ न होणे तसेच इतर काही पोटाचे आजार उद्भवू शकतात.
Published on: 08 December 2021, 09:02 IST