1. आरोग्य सल्ला

तुळशी मिल्क : पाच रोगांना दूर करण्याबरोबर वाढवते रोगप्रतिकारक शक्ती ; जाणून घ्या! तुळशी मिल्क बनवण्याची पद्धत

तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, यामुळे तुळशीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानंतर अनेक विकार दूर होतात. सध्या जगात कोरोना नावाचा आजार पसरला आहे. हा आजार आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो, यामुळे सरकारकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास भर दिला आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


तुळशीच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, यामुळे तुळशीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. तुळशीच्या पानांचे सेवन केल्यानंतर अनेक विकार दूर होतात. सध्या जगात कोरोना नावाचा आजार पसरला आहे. हा आजार आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो, यामुळे सरकारकडून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास भर दिला आहे. तुळशीच्या पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. यामुळे तुळशीची पाने आपण सेवन केली पाहिजे.  परंतु तुम्हाला माहिती आहे का?  जर तुळशीची पाने दुधात टाकून  दूध गरम केले आणि ते पिले तर आपण अनेक विकारातून मुक्त होऊ शकतो.  चला तर मग तुळशी दूध म्हणजेच तुळशी मिल्क बनवण्याची पद्धत आणि याचे सेवन करण्याची वेळ याची माहिती घेऊया.

कसे कराल सेवन  - तुळशी मिल्क बनवण्यासाठी दीड ग्लास दूध गरम करावे. दूध गरम करताना त्यात ८ ते १० तुळशीची पाने टाकावीत. गरम करताना दूध थोडं अटू द्यावे, एक ग्लास दूध राहिले असेल तर गॅस बंद करावा. दूध थोडं गार झाल्यानंतर घ्यावे. नियमित तुळशी मिल्क घेतल्यानंतरच तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

कोणते विकार होतात दूर

मायग्रेन पासून होते मुक्ती - दुधात तुळशीची पाने टाकून पिल्यानंतर डोके दुखी आणि मायग्रेन सारखी समस्या दूर होते. जर आपणास मायग्रेनचा त्रास बऱ्याच दिवसांपासून असेल तर आपण दररोज तुळशी मिल्कचे सेवन करावे.

तणावापासून होते मुक्ती -

जर आपण ऑफिसचे टेन्शन किंवा कुटुंबातील वादामुळे तणावात राहत असाल तर तुळशी मिल्क आपल्याला यातून सुटका देणार आहे. तुळशीच्या पानात हिलिंगचे गुण असतात. दुधात तुळशीचे पाने टाकून त्याचे सेवन केल्यास तणावही दूर होतो.

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत - सध्या कोरोनासारख्या आजाराची साथ चालू आहे. कोरोना आपल्या शरिरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी करत असतो. अशात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची गरज असते आणि ते मिळते तुळशी मिल्क मधून.  तुळशीच्या पानात एंटीऑक्सीडेंट्स हे गुण असतात हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. यासह तुळशीमध्ये एंटीबॅक्टेरिअल आणि एंटीवायरल हे गुण असल्याने सर्दी, खोकला, तापही दूर होत असतो.

हृदयाची घेते काळजी -  दुधात तुळशीचे पाने टाकून दूध गरम केल्याने  आपले हृदय पण निरोगी राहते.  रोज रिकाम्या पोटी तुळशी मिल्क पिल्याने हृदय रोग्यांना फायदा होत असतो.

दमाच्या विकारापासून ठेवते दूर   जर आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुळशी मिल्क घ्यावे. या आजारापासूनही तुळशी मिल्क आपली सुटका करेल.

English Summary: ayurvedic immunity boosting tips these 5 diseases are cured by boiling basil tulshi leaves milk Published on: 19 June 2020, 01:48 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters