मित्रांनो आपण आपल्या आहारात वेगवेगळ्या पदार्थाचा समावेश करत असतो. यामुळे आपल्या शरीरासाठी आवश्यक पोषक घटकांची पूर्तता होतं असते. मात्र आपल्या आहारात समाविष्ट असेही काही घटक आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला हानी देखील पोहचू शकते. अशाच पदार्थापैकी एक आहे सोडियम यामुळे आपल्या शरीराला हार्ट अटॅक सारख्या समस्येला तोंड द्यावे लागू शकते.
एका संशोधनात शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की, सोडियम, म्हणजेच तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट असलेले मीठ हृदयविकार होण्याचे प्रमुख कारण बनू शकते. इतकेच नाही तर सोडियम हे इतर अनेक आजारासाठी देखील कारणीभूत ठरू शकते. आता तुम्ही म्हणत असाल मीठ तर आपल्या आहारात एक मुख्य घटक आहे. मात्र हा महत्वाचा घटकच हार्ट अटॅक साठी कारणीभूत ठरत आहे. मीठचं एक पॉकेट अवघ्या 20 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतं मात्र हेचं मीठ हृदय बिघडवण्याचे काम करते, पण कसे, हेच आज आपण जाणून घेऊया.
महत्वाच्या बातम्या:
Health Tips : भाजलेले चणे आरोग्यासाठी आहेत खूपच फायदेशीर; आपल्या आहारात नक्कीच करा याचा समावेश
खरं पाहता हृदयविकाराची कारणे अनेक आहेत. पण त्यापैकी एक तुमच्या जेवणाच्या ताटात रोज हजर असणार घटक आहे. म्हणून जर तुम्ही सोडियमचे सेवन कमी केले तर तुम्ही हृदयविकारापासून निश्चितच बरे बचावू शकतात आणि तुमचे हृदयाचे आरोग्य अबाधित ठेवू शकता.
मिठाचे कमी प्रमाणात सेवन तुमच्यासाठी आहे फायदेशीर - द लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालात असे आढळून आले आहे की, आहारात मीठाचे सेवन कमी केल्याने हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब, स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेज यांसारख्या अनेक आजारांचा धोका खुपच कमी होऊन जातो. इतकेच नाही तर जळजळ, थकवा आणि खोकला होण्यामागे देखील मीठचं कारणीभूत असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे.
हार्ट फेल होणे म्हणजे नेमके काय - एका संशोधन पथकाने मेक्सिको, यूएसए, कॅनडा, कोलंबिया, चिली आणि न्यूझीलंडमधील 26 वैद्यकीय केंद्रांमधील 806 रुग्णांचा डेटा घेतला. हे सर्व रुग्ण हृदयविकाराचे बळी असून उपचाराने बरे झाले होते.
हार्ट फेल्युअर म्हणजे जेव्हा रक्त हृदयापर्यंत नीट पोहोचत नाही आणि यासाठी हृदय जलद पंप करते आणि वाढत्या दाबामुळे ते रक्त नीट पंप करू शकत नाही. या स्थितीत हृदय निकामी होण्याचा धोका असतो. जेव्हा या सर्व लोकांनी पोषणतज्ञांच्या मदतीने मिठाचे सेवन लक्षणीयरीत्या कमी केले तेव्हा त्यांच्या हृदयाच्या स्थितीत चांगली सुधारणा दिसून आली.
जाणून घ्या एका दिवसात किती मीठ सेवन केलं पाहिजे - डब्ल्यूएचओने सामान्य माणसाला ज्यांना कोणत्याही प्रकारचा आजार नाही अशा व्यक्तीला दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ म्हणजेच एक चमचा मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे. त्याच वेळी, ज्यांना डॉक्टरांनी कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला आहे, त्यांनी फक्त एक तृतीयांश मीठ घ्यावे. निश्चितच आपण WHO ने सांगितलेल्या प्रमाणातच मिठाचे सेवन कराल आणि निरोगी राहाल.
Published on: 30 April 2022, 10:51 IST