Health

भारतात केला जाणारा हळदीचे उपयोग- भारतीय खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत जे हळदी शिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत.

Updated on 01 June, 2022 5:12 PM IST

म्हणूनच भारतातील प्रत्येक स्वयंपाकघरात मसाल्याच्या डब्यात हळद ही असते. कारण हळदीचे अनेक उपयोग दैनंदिन जीवनात होत असतात. पिवळ्या धम्मक हळदीला एक उग्र सुवास असतो. चिमुटभर हळद खाद्यपदार्थांना एक विशिष्ठ स्वाद देते. खाद्यपदार्थांना हळदीमुळे पिवळा रंग मिळतो. ज्यामुळे पदार्थ दिसायला आकर्षक आणि चवीला स्वादिष्ट होतात. हळदीचा पिवळा रंग इतका गडद असतो की तो जर चुकून कपड्यांना लागला तर तो काढून टाकणे कठीण असते.हळदीचे औषधी गुणधर्म-हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यासाठी वापरली जाते. हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट, अँटी व्हायरल, अँटी फंगल, अँटी म्युटाजेनिक आणि अँटी इनफ्लेैमटरी गुणधर्मांमुळे आरोग्य समस्या कमी होतात.

शिवाय खाद्यपदार्थांतून हळद नियमित पोटात गेल्यामुळे अनेक आरोग्य समस्या तुमच्यापासून दूर राहू शकतात. त्वचेवर हळदीचा लेप अथवा फेसपॅक लावल्यामुळे त्वचा समस्या कमी होतात. भारत आणि चीनमध्ये हळद प्राचीन काळापासून औषध म्हणून वापरली जाते. आता तर पाश्चात्य देशात देखील हळद वापरण्यास सुरूवात झाली आहे.हळदीचे फायदे-हळद ही अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते यासाठीच जाणून घ्या हळदीचे फायदेआर्थ्राटीसवर गुणकारी (Beneficial In Arthritis)हळदीमध्ये अँटी इनफ्लैमटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे आर्थ्राटीसवर उपचार करण्यासाठी हळद गुणकारी ठरते. हळदीमधील अँटी ऑक्सिडंट गुणधर्म पेशींचे नुकसान करणाऱ्या जीवजंतूंना नष्ट करतात. आर्थ्राटीसच्या रूग्णांना वेदना आणि सूजेपासून आराम मिळण्यासाठी हळद फारच उपयुक्त ठरते. असं असलं तरी केवळ हळद या आजारावर उपचार करण्यास समर्थ नाही. 

यामुळे रुग्णाला काही काळ आराम नक्कीच मिळू शकतो. मात्र इतर वैद्यकीय उपचारदेखील यासोबत घेणं फार गरजेचं आहे.ह्रदयाचे आरोग्य सुधारते (Good For Heart)ह्रदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी कोलेस्ट्रॉल वर नियंत्रण राखणे गरजेचं आहे. हळदीमधील करक्युमिन आणि व्हिटॅमिन 6 कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुमचे ह्रदय मजबूत आणि निरोगी राहते.यकृताचे संरक्षण होते (Protects Liver)हळदीमुळे शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढते ज्यामुळे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात.यकृत डिटॉक्स झाल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते.यकृताचे इनफेक्शनपासून संरक्षण झाल्यामुळे यकृत निरोगी राहण्यास मदत होते.अल्झामरपासून सुरक्षा मिळते (Protects Against Alzheimer)हळदीमध्ये टरमेरॉन हा घटक तुमच्या मेंदूच्या पेशींना सुरक्षित ठेवतो. नियमित हळदीचे सेवन केल्यामुळे स्ट्रोक आणि अल्झामर सारख्या आजारांपासून सुरक्षा मिळते. 

याशिवाय हळदीतील गुणकारी घटकांमुळे अल्झामर रूग्णांची स्मरणशक्ती पुन्हा सुधारण्यास मदत होते. मेंदूचे कार्य सुधारते आणि मेंदूला पुरेशा ऑक्सिजनचा पुरवठा होतो.मधुमेहावर गुणकारी (Benefitial In Diabetes)हळदीमधील अँटी इनफ्लेेमटरी आणि अँटी ऑक्सिडंट गुणांमुळे प्री-डायबेटीजच्या रूग्णांना टाईप 2 मधुमेह होण्याचा धोका टाळता येतो. शिवाय यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलिनची निर्मिती वाढण्यास मदत होते. इन्शुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होऊ लागल्यास तुमच्या मधुमेहाच्या समस्येमधून तुम्हाला सुटका मिळू शकते. मात्र यासाठी वैद्यकीय उपचार करणे सोडू नये कारण प्रत्येकाच्या शरीरप्रकृतीनुसार उपचारांचा फरक जाणवत असतो. यासाठी हळदीच्या वापरासोबत वैद्यकीय उपचार आणि औषधेदेखील घेणे गरजेचे आहे.पचन क्रिया सुधारते (Improves Digestion)पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते. कारण हळद पित्ताशयातील पित्ताच्या निर्मितीला अर्थात पित्ताच्या त्रासाला उत्तेजन देते.

ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुरळीत होते. हळदीच्या वापरामुळे पोटातील गॅस आणि आतड्यांची सूजदेखील कमी होण्यास फायदा होतो.गंभीर जखमा बऱ्या होतात (Heals Wounds)पूर्वीच्या काळी जेव्हा जखम अथवा दुखापत होत असे तेव्हा त्याच्यावर हळदीचा लेप लावून उपचार केले जात असत. कारण हळदीमध्ये नैसर्गिक अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे जखमांचे जंतूपासून संरक्षण होते, दाह कमी होतो आणि जखम भरून निघण्यास मदत होते. यासाठी जर तुम्हाला एखादी जखम झाली तर प्रथमोपचारांसाठी त्यावर शुद्ध हळद लावण्यास काहीच हरकत नाही.रोगप्रतिकारक शक्ती वाढते (Immunity Booster)हळदीमधील अँटी बॅक्टेरिअल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्मांमुळे माणसाच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. यासाठी रोज रात्री एक ग्लास कोमट दुधात एक चिमुट हळद टाकून ते प्या. ज्यामुळे तुम्हाला ताप, सर्दी, खोकला होणार नाही.

English Summary: Awesome Ayurvedic importance of turmeric
Published on: 01 June 2022, 05:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)