Health

भारतात आरोग्यम् धनसंपदा अर्थात सदृढ आरोग्य हिच मानवाची खरी संपत्ती आहे, असे सांगितले जाते. जे की 100 टक्के खरी गोष्ट आहे. आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आपणास खान पानावर विशेष लक्ष द्यावे लागते याशिवाय आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावा लागतो. अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे मोठे गंभीर विकार शरीराला जडत असतात, त्यामुळे आपणास आपल्या सवयींमध्ये मोठा अमुलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक असते.

Updated on 27 February, 2022 3:12 PM IST

भारतात आरोग्यम् धनसंपदा अर्थात सदृढ आरोग्य हिच मानवाची खरी संपत्ती आहे, असे सांगितले जाते. जे की 100 टक्के खरी गोष्ट आहे. आपले आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी आपणास खान पानावर विशेष लक्ष द्यावे लागते याशिवाय आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करावा लागतो. अनेकदा आपल्या चुकीच्या सवयीमुळे मोठे गंभीर विकार शरीराला जडत असतात, त्यामुळे आपणास आपल्या सवयींमध्ये मोठा अमुलाग्र बदल घडवून आणणे आवश्यक असते.

आज आपण अंघोळ करताना कोणत्या चुका करणे टाळाव्या याविषयी जाणून घेणार आहोत, अनेकदा आपण चुकीच्या पध्ततीने अंघोळ करत असतो त्यामुळे आपल्या शरीरात अनेक त्वचेचे विकार जडू शकतात. त्यामुळे आज आपण अंघोळ करताना कोणत्या गोष्टी टाळाव्या हे जाणून घेणार आहोत.

गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे 

अनेक लोक अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करत असतात मात्र यामुळे शरीराला अनेक गंभीर आजार जडू शकतात, त्यामुळे जास्तीच्या गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे. हिवाळ्यात अनेकांना जास्तीचे गरम पाणी अंघोळीसाठी लागत असते मात्र यामुळे स्किनवर पुरळ येण्याच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे कोमट पाण्याने अंघोळ करावी असा सल्ला दिला जातो.

अंघोळ करताना स्कीन जोरात रगडणे 

अनेक लोकांना असे वाटते की अंघोळ करताना स्कीन फेना लावून घासल्याने शरीर चांगले स्वच्छ बनते. शरीरावर जमा झालेला मळ यामुळे निघून जातो मात्र असे काही नसते आपण स्कीन दगड अथवा फेणा लावून घासन्यापेक्षा फक्त साबण लावावा. फेना लावून स्कीन रगडल्यामुळे स्कीन वर रेसेज येऊ शकतात तसेच स्किनवर लाल चट्टे पडू शकतात.

अधिक साबणाचा वापर 

अनेक लोकांना अस वाटत की जास्त साबण लावल्याने स्कीन चांगली स्वच्छ बनत असते मात्र असे काही नसत याउलट अधिक साबण वापरल्याने स्कीनवर याचा विपरीत परिणाम होत असतो. जाणकार लोकांच्या मते साबणात असलेल्या केमिकल्समुळे स्कीनवर पुरळ येऊ शकतात तसेच यामुळे त्वचा ड्राय बनत असते. त्यामुळे अधिक साबणाचा वापर करू नये असा सल्ला दिला जातो.

चुकीचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणे 

अनेक लोक कोणताही विचार न करता चुकीचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरत असतात यामुळे अशा प्रोडक्टमध्ये असलेले केमिकल शरीरावर विपरीत परिणाम करत असतात. त्यामुळे स्वस्तात भेटतात म्हणून कोणतेही चुकीचे कॉस्मेटिक प्रोडक्ट वापरणे टाळावे.

English Summary: avoid this mistakes while bathing
Published on: 27 February 2022, 03:12 IST