Health

प्रत्येक भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे दूध. प्रत्येक जण दुधाचे सेवन मोठ्या आवडीने करत असतो. अनेकांना दूध पिणे विशेष पसंत असते, दुधाचा वापर चहा मध्ये, कॉफीमध्ये, मिल्क शेक, बदाम शेक इत्यादी मध्ये आपण नेहमी करत असतो. दुध चवीला जेवढं स्वादिष्ट असतं तेवढेच त्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्याला विशेष फायद्याचे ठरत असतात. आयुर्वेदात दुधाला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे. मानवी शरीरासाठी आवश्यक असणारे अनेक पोषकतत्त्वे दुधात आढळत असतात त्यामुळे आहार तज्ञ तसेच डॉक्टर देखील दुधाचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

Updated on 06 March, 2022 11:23 AM IST

दुधात आढळणारे कॅल्शियम मानवी शरीराला विशेष फायद्याचे असते, कॅल्शियममुळे मानवी शरीराची हाडे मजबूत होण्यास मदत होते. असे सांगितले जाते की, दुधात हळद टाकून प्यायल्याने सर्दी खोकला यांसारख्या अनेक हंगामी आजारांपासून मुक्तता मिळत असते. असे असले तरी, अनेक लोक दुधाचे सेवन चुकीच्या पदार्थांसोबत करताना बघायला मिळतात. आज आपण दुधाचे सेवन कशा बरोबर करू नये याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

दुधासोबत हे पदार्थ खाऊ नये- मिठा पासून तयार झालेले पदार्थ- मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की,आयुर्वेदामध्ये मीठ आणि दूध याचे एकत्रित सेवन करणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मीठ आणि दूध एकत्रित सेवन केल्याने मीठ दुधाला विषारी बनवते आणि ते शरीरात जाऊन अनेक त्वचा रोगांना जन्म देते. म्हणूनच दुधासोबत खारट पदार्थ खाणे टाळावे, एवढेच नाही जर आपण खारट पदार्थ खाल्ले असतील तर सुमारे दोन तासानंतर दुधाचे सेवन करावे असे सांगितले जाते.

उडीद डाळ सोबत- असे सांगितले जाते की, दूध जरी मानवी शरीराला फायदेशीर ठरत असले तरी याचे सेवन उडीद डाळ बरोबर केल्यास यामुळे शरीरात अनेक विकार तयार होऊ शकतात. एवढेच नाही दुधाचे सेवन आंबट पदार्थांसोबत करू नये, तसेच आंबट पदार्थ किंवा फळे खाल्ल्यानंतर देखील दुधाचे सेवन करू नये.

मांसाहारासोबत आणि दह्यासोबत- मांसाहार सोबत तसेच मांसाहार केल्यानंतर दुधाचे सेवन करणे टाळावे. विशेषता मासे खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन करू नये कारण की यामुळे शरीरात विषबाधा तयार होण्याची शक्यता असल्याचे तज्ञाद्वारे सांगितले जाते. मांसाहाराबरोबरच दहीसोबत किंवा दही खाल्ल्यानंतर देखील दुधाचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो कारण की, दही खाल्ल्यानंतर दुधाचे सेवन केल्यास त्यामुळे शरीराला कुठलाच फायदा मिळत नाही याउलट पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे अपचन सारख्या समस्या निर्माण होतात.

Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.

English Summary: avoid these things with the milk otherwise
Published on: 06 March 2022, 11:23 IST