उन्हाळ्यामध्ये नाकातील रक्तवाहिन्या प्रसरण पावल्यामुळे तेथील श्लेष्मल पदार्थ वितळून रक्तस्राव होतो.यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील कोरड्या हवेमुळे नाकाच्या अंतर्भागातील श्लेष्मल पदार्थ कोरडा व शुष्क बनतो, त्यामुळे नाकातून रक्तस्राव होण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यातील हा रक्तस्राव टाळण्यासाठी कडक उन्हात व कोरड्या हवेत बाहेर जाणे टाळावे.
नाकातील रक्तस्राव तो सर्वसाधारणपणे उन्हाळ्याच्या तीव्र मोसमामध्ये होतो. दिवसातून एकदा सौम्य पाण्याचा वाफारा घ्यावा. नाकामध्ये दीर्घकाळ चोंदलेले नाक साफ करणारे औषध वारंवार टाकणे टाळावे. त्याऐवजी नाकाच्या अंतर्भागात सौम्य ओलसर वाफ, नाक साफ करायची वैद्यकीय पिचकारी किंवा नळी यांचा वापर करावा.
तसेच नाकाच्या अंतर्भागात कडक पापुद्रे तयार होऊ नयेत म्हणून वॅसलिन सारखे औषध वापरावे. नाकातील रक्तस्रावाचे प्रमाण हे रक्तदाबाच्या अचानक वाढीमुळे विशेषत: वयोवृद्ध रुग्णांमध्ये अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे नाकातून सतत रक्तस्राव होत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत.
भटक्या गायींपासून सुटका होणार, गोशाळा करू शकतील नवीन व्यवसाय, नीती आयोगाची नवीन योजना
तसेच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी उच्च रक्तदाबरोधक औषधे नियमित सेवन केल्यास अशाप्रकारचा नाकातील रक्तस्राव थांबवता येऊ शकतो. जर तुम्हाला उन्हाळ्यात नाकाच्या रक्तस्रावाचा त्रास झाल्यास तात्काळ कान-नाक-घसा तज्ज्ञाची भेट घ्या.
लिटरला 1500 हजार रुपये! ही शेती शेतकऱ्यांना करणार मालामाल..
घरगुती प्राथमिक उपचार म्हणून रक्त थांबवण्यासाठी नाक दाबून ठेवणे, बर्फाचा शेक घेणे असे करता येऊ शकते; परंतु या नंतरही नाकातील रक्तस्राव सतत होत राहिल्यास कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.
Cashew: आफ्रिकेतील काजू, पंढरपूरमध्ये प्रक्रिया, ओझेवाडीचा शेतकरी मोळवतोय लाखोंचा फायदा..
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
भीमा पाटस कारखान्यात 500 कोटींचा गैरव्यवहार? संजय राऊतांच्या आरोपाने उडाली खळबळ
Published on: 13 March 2023, 12:29 IST