आवळा अनेक लोकांना खाण्यास विशेष आवडतो. आवळा चवीला देखील चांगला असतो शिवाय यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी तसेच केसांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आवळ्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये आढळणारे औषधी गुणधर्म मानवी शरीरातील अनेक विकारांना दूर ठेवण्यास मदत करते. आवळ्यामध्ये असणारे औषधी गुणधर्ममुळे याला सुपर फूड म्हणून संबोधले जाते. आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशिष्ट स्थान आहे, आवळ्यात संत्रा पेक्षा 20 पट अधिक विटामिन सी आढळत असल्याचे सांगितले जाते.
याव्यतिरिक्त आवळ्यात विटामिन बी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट्स आणि फायबर यासारखे गुणधर्म देखील आढळतात, जे शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. आवळा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे जरी शाश्वत सत्य असले तरी काही लोकांना आवळा हानी पोहचवू शकतो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणत्या लोकांनी चुकूनही करू नये आवळा सेवन.
या लोकांनी चुकूनही करू नये आवळ्याचे सेवन
»ऍसिडिटी - ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो त्यांनी गुसबेरी अर्थात आवळा खाणे टाळावे. आवळ्यामध्ये जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असल्यामुळे हायपर ऍसिडिटी असलेल्या लोकांच्या समस्या अजून वाढू शकतात.
»रक्त रोग असलेले लोक
आवळ्यामध्ये अँटीप्लेटलेट नामक गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात हा आवळ्याचा गुणधर्म मानवी शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून वाचवते. आवळ्याच्या या गुणधर्मामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो, परंतु ज्यांना आधीच एखाद्या रक्त विकाराने ग्रासले आहे त्यांनी आवळ्याचे सेवन करू नये किंवा अशा लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच आवळा खावा.
»सर्जेरी- जर एखाद्या व्यतिने चालूच एखादी शस्त्रक्रिया अर्थात सर्जेरी केली असेल तर गूसबेरी अर्थात आवळा तसेच आवळ्याच्या बिया खाने टाळावे. याचे अधिक सेवन केल्यास रक्तस्त्राव होण्याचा धोका वाढतो. प्रदीर्घ रक्तस्रावामुळे हायपोक्सिमिया, गंभीर ऍसिडोसिस किंवा मल्टीऑर्गन डिसफंक्शन होऊ शकते. त्यामुळे नुकतीच शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीने आवळ्याचे सेवन शक्यतो टाळावे.
»लो ब्लड शुगर- जर एखाद्या व्यक्तीची साखरेची पातळी कमी असेल अर्थात लो ब्लड शुगर ची समस्या असेल तर अशा व्यक्तींनी आवळ्याचे सेवन कमी करावे नाहीतर पूर्णता टाळावे. आवळा रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे जे लोक मधुमेहाची औषधे घेत आहेत त्यांनी आवळ्याचे सेवन कमी करावे, किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आवळ्याचे संतुलित प्रमाणात सेवन करावे.
Published on: 02 March 2022, 10:35 IST