Health

Apple Side Effects : मित्रांनो आपण फळांचे (Fruits) मोठ्या प्रमाणात सेवन करत असतो. विशेष म्हणजे फळे आरोग्यासाठी (Health Benefit) किती फायदेशीर असतात हे आपणा सर्वांना माहीतचं आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात आपण फळांचा कायमच समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

Updated on 04 September, 2022 8:01 AM IST

Apple Side Effects : मित्रांनो आपण फळांचे (Fruits) मोठ्या प्रमाणात सेवन करत असतो. विशेष म्हणजे फळे आरोग्यासाठी (Health Benefit) किती फायदेशीर असतात हे आपणा सर्वांना माहीतचं आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात आपण फळांचा कायमच समावेश करण्याचा प्रयत्न करत असतो.

बाजारात अशी काही फळे आहेत ज्यांना मोठी मागणी असते. आपणांस काही फळे डॉक्टर आवर्जून खाण्याचा सल्ला देतात. आणि सफरचंद (Apple Fruit Benefits) हे अशाच फायदेशीर फळांपैकी एक आहे. सफरचंद हे मानवी आरोग्यासाठी (Human Health) खूप फायदेशीर मानले जाते.

सफरचंद (Apple Fruit) हे पोषक तत्वांचे भांडार असल्याचे सांगितले जाते. यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन बी आणि आयरन मुबलक प्रमाणात असतात. यामुळे सफरचंद आरोग्य सुधारण्यासाठी (Health Tips) महत्वाचे फळ आहे.

यात तिळमात्र देखील शँका नाही. परंतु असे म्हटले जाते की प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. तसेच अति तिथे माती होते. त्याचप्रमाणे सफरचंदाचे अतिसेवन देखील आपल्यासाठी घातक ठरु शकते.

याचे जास्त प्रमाणाबाहेर सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशा परिस्थितीत आज आपण सफरचंद जास्त प्रमाणात खाल्ल्याने होणारे तोटे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.

सफरचंद खाण्याचे तोटे देखील आहेत (Apple Side Effects):-

पोटाशी संबंधित समस्या :- सफरचंदाच्या अतिसेवनामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो. सफरचंदात जास्त प्रमाणात फायबर असल्यामुळे काहीवेळा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिस्टीममध्ये गॅस तयार होतो आणि त्यामुळे पोटदुखी, पेटके यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे याचे सेवन जपून आणि नियंत्रणात करा.

रक्तातील साखरेची समस्या :- तसे, साखरेच्या रुग्णांसाठी सफरचंदांचे सेवन सुरक्षित मानले जाते. पण याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. सफरचंदात कार्बोहायड्रेट, फायबर आणि इतर पोषक घटक असतात.

वजन समस्या

जर तुम्ही डाईट करत असाल आणि वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सफरचंदाचे जास्त सेवन करणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. सफरचंदात कॅलरीज आणि साखर मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे चरबी वाढू शकते. यामुळे वजन कमी करणाऱ्या लोकांनी याचे सेवन टाळावे.

English Summary: apple side effects for human health marathi
Published on: 04 September 2022, 08:01 IST