Health

चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा कहर बघायला मिळत आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. असे असताना आता परदेशातून मुंबईमध्ये परतलेले तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या तिघांमध्येही कोरोनाचा BF.7 हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

Updated on 17 January, 2023 12:01 PM IST

चीनमध्ये सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा कहर बघायला मिळत आहे. यामुळे जगाची चिंता वाढली आहे. असे असताना आता परदेशातून मुंबईमध्ये परतलेले तीन जण कोरोनाबाधित आढळले आहेत. या तिघांमध्येही कोरोनाचा BF.7 हा व्हेरिएंट आढळून आला आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. यामुळे आता प्रशासन सतर्क झाले आहे. चीनमधल्या कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरलेला हा व्हेरिएंट महाराष्ट्रात पहिल्यांदाच आढळून आला आहे.

यामुळे आता काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विमानतळावर आरटीपीसीआर चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले सगळे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्याचे आदेश केंद्राने प्रत्येक राज्याला दिले आहेत.

एकदा लावले की ४० वर्ष पैसाच पैसा!! बांबू शेती ठरतेय फायदेशीर..

तीन बाधित प्रवाशांपैकी दोघे चीनमधून मुंबईत परतले होते तर एक व्यक्ती कॅनडामधून आला होता. तिघांचेही नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत.

Red Ladyfinger: शेतकऱ्यांनो एकदा लाल भेंडी लावाच, मोठ्या मागणीमुळे मिळतोय जास्तीचा भाव..

या तिघांचीही प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अद्याप गरज पडलेली नाही. यामुळे आता त्यांच्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्यांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यांना सौम्य लक्षणे दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ममता जैन यांची कृषी जागरण समूहाच्या संपादक नियुक्ती...
विनाश पृथ्वीचा नाही, जीवसंस्कृतीचा होऊ शकतो
देशातील इथेनॉल क्षमता 25 टक्यांनी वाढणार, शेतकऱ्यांना होणार फायदा..

English Summary: Anxiety increased! Variant covered smoke entered Mumbai, 3 patients
Published on: 17 January 2023, 12:01 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)