हा अन्नघटक किमान तीनशे चयापचय क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रथिने तयार करणे, पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करणे आणि ती साठवून ठेवणे, गुणसूत्र बनताना याची भूमिका महत्त्वाची असते. एक केळे, मूठभर शेंगदाणे, बदाम मिक्स, पालक आणि सोयाबीन हे पदार्थ आहारात असले तर या अन्नघटकाची कमतरता निर्माण होणार नाही. कोणता आहे हा अन्नघटक?
आज आपण अशा एका सूक्ष्म अन्नघटकाबद्दल बोलणार आहोत, जो लोकप्रिय किंवा माहितीतल्या अन्नघटकांइतकाच महत्त्वाचा आहे पण त्यांच्याइतका लोकप्रिय नाही. त्याबद्दल फारशी जागरूकता नाही. मधुमेह होण्यासाठी याची कमतरता कारणीभूत असतेDeficiency of this causes diabetesआणि मधुमेह असणाऱ्या माणसात याची कमतरता निर्माण होते.
याचे प्रमाण कमी झाले तर पटकन कळतदेखील नाही. भूक कमी होणे, थकवा जाणवणे, स्नायू आकुंचनाचा झटका येणे, हातपाय बधिर होणे किंवा हातापायाला मुंग्या येणे ही लक्षणे इतकी सर्वसामान्य आहेत की असे काही झाले की लोक लिंबूपाणी, नारळपाणी, जीवनसत्त्वाच्या गोळ्या घेतात आणि मग थोडेसे बरे वाटले की विसरून जातात. कधी
कधी पोटात ढवळून ओकंबे ( नॉशिया ) येतात. असे झाले की मग यकृतासाठीची औषधे दिली - घेतली जातात. किडनी किंवा आतड्याचे रोग असतील तरच याची तीव्र टंचाई निर्माण होते. तेव्हा आकडी येऊ शकते. दारू पिण्यात सातत्य असेल आणि सोबत योग्य आहार नसेल तरी याची कमतरता निर्माण होते. साधारणपणे याची कमतरताही लक्षात येत नाही.
एक मात्र खरे की, याची कमतरता भरून निघाली तर मात्र तब्येतीतला फरक स्वतःलाच जाणवतो.हा अन्नघटक कुठे कुठे वापरला जातो किंवा गेला तर जास्त फायदा होतो ते पाहू या. साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो. रक्तदाब नियंत्रणात राखण्यासाठी, हाडांच्या मजबुतीसाठी, मायग्रेनचा अॅटॅक टाळण्यासाठी ताणतणाव कमी करण्यासाठी,
मूड सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी, प्रतिदाह ( इनफ्लेमेशन ) कमी करण्यासाठी आणि एडीएचडी ( अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर ) मध्ये या अन्नघटकाचा उपयोग केला जातो. यातील ' ताणतणाव कमी करणे ' हा शब्दप्रयोग थोडा फसवा आहे. ताणतणावाची कारणे
कमी होत नाहीत किंवा बदलत नाहीत पण त्या कारणांचे मनावर आणि शरीरावर होणारे परिणाम बदलतात.तणाव नियंत्रणासाठी जे अन्नघटक मदत करतात.हा अन्नघटक नेहमीच्या आहारातील अनेक पदार्थांमधून मिळतो . उदा , पालक, बदाम, साधे शेंगदाणे,सोया मिल्क, राजमा, केळी आणि साली सकट बटाटा.इतक्या सगळ्या वर्णनानंतर आता सांगतोच हा महत्वाचा अन्नघटक आहे , मॅग्नेशियम
Nutritionist & Dietician
Naturopathist
Dr. Amit Bhorkar
whats app:7218332218
Published on: 02 August 2022, 02:11 IST