Health

भारतात हिवाळ्यात बहुतांश व्यक्ती सकाळी सकाळी चहा पिणे पसंत करतात. चहा भारताचे एक राष्ट्रीय पेय आहे, चहा विना लोकांची सकाळ गोड होत नाही. त्यामुळे जवळपास सर्वच व्यक्ती दिवसाची सुरुवात चहा पिऊन करत असतात. हिवाळ्यात गुळाचा चहा (Jaggery tea) पिल्याने शरीराला उब मिळत असते म्हणून अनेक जण गुळाचा चहा सेवन करत असतात. गुळामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात म्हणून गुळाचा चहा पिण्याची शिफारीश तज्ञ करत असतात. गूळ चवीला जेवढा स्वादिष्ट लागतो तेवढेच त्यात औषधी गुणधर्म (Medicinal properties) देखील भरलेले असतात. गुळाचे चहा पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळत असतात. असे सांगितले जाते की गुळाचा चहा पिल्याने मानवी शरीराचे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित रित्या होत असते शिवाय गुळाचा चहा पिल्याने रक्तातील आयरन नियंत्रित राहण्यास मदत होते. असे असले तरी गुळाचा चहा फक्त आपल्या शरीराला फायदेच पोहोचवतो असे नाही यामुळे आपल्या शरीराला अनेक अपायकारक समस्येला देखील तोंड द्यावे लागते. आज आपण आपल्या या लेखाच्या माध्यमातून गुळाचा चहा पिल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे तसेच तोटेही जाणून घेणार आहोत (the benefits and disadvantages of drinking jaggery tea).

Updated on 10 January, 2022 4:20 PM IST

गुळाचा चहा पिल्याने आपल्या शरीराला होणारे फायदे

आहार तज्ञांच्या मते गुळात साखरेपेक्षा अधिक विटामिन आणि मिनरल्स आढळतात ज्यामुळे याचे सेवन मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते. गुळात असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे याचे सेवन केल्याने ऍनिमियापासून बचाव केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर गुळाचा चहा नियमितपणे सेवन केल्याने कर्करोगासारख्या भयंकर आजारांपासून देखील वाचले जाऊ शकते. शिवाय गुळाचा चहा सेवन केल्याने थकवा दूर होतो आणि यामुळे मानवी शरीर टवटवीत राहते.

आयरन ची कमतरता असल्यास (If you are deficient in iron)

मित्रांनो आयरन आपल्या शरीरासाठी खूपच उपयोगी घटक असतो, रक्तात देखील आयरन आढळतो. आणि हा शरीरासाठी महत्त्वपूर्ण असलेला घटक कुळात मोठ्या प्रमाणात आढळतो त्यामुळे जर रक्तात आयर्नची कमतरता असेल तर अनेक आहार तज्ञ गुळाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. म्हणून जर रक्तात आयर्नची कमतरता असेल तर गुळाचा चहा नियमितपणे सेवन करावा.

ॲनिमिया पासून बचाव करते (Prevents anemia)

शरीरात आयरन ची कमतरता असली तर कुपोषण सारखे महाभयंकर आजार जडतात. कुपोषण हे लहान मुलांमध्ये पोषकतत्वाच्या कमतरतेमुळे तयार होणारा रोग आहे. कुपोषण हे मुख्यतः आयरनच्या कमतरतेमुळे जाणवते, आणि म्हणूनच गुळात आयरनचे प्रमाण जास्त असल्याने गुळाचा चहा नियमित पिल्याने रक्तातील अहिरांची कमतरता दूर होते व एनिमीया सारखे आजार होत नाहीत.

अन्य रोगापासून बचाव करते (Protects against other diseases)

गुळामध्ये अनेक एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळतात एंटीऑक्सीडेंट विविध रोगांपासून मानवी शरीराला वाचवण्याचे कार्य करत असतात. गुळामध्ये फेनोलिक ऍसिड देखील आढळते जे की ताणतणाव कमी करण्यास मदत करते. गुळामध्ये आढळत असलेल्या एंटीऑक्सीडेंट मुळे विविध आजारांच्या पीडा कमी केल्या जाऊ शकतात. गुळाचे नियमित सेवन केल्याने कॅन्सर सारख्या महाभयंकर आजारांमुळे होणारी पीडा देखील कमी केली जाऊ शकते.

गुळाचा चहा पिल्याने मानवी शरीराला होणारे नुकसान (Harm to human body by drinking jaggery tea)

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे गुळाचा चहा पिल्याने अनेक आश्चर्यकारक फायदे आपल्या शरीराला मिळत असतात. मात्र असे असले तरी गुळाचा चहा जास्त प्रमाणात सेवन केल्याने आपल्या शरीराला काही तोटे देखील सहन करावे लागू शकतात. चला तर मग मित्रांनो याविषयी जाणून घेऊया.

शरीरातील साखरेचे प्रमाण वधारते (Increases the amount of sugar in the body)

गुळाचे संतुलित प्रमाणात सेवन करणे गरजेचे असते, गुळाचे अति सेवन केल्याने मानवी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास यामुळे डायबिटीस सारख्या आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे गुळाचे संतुलित प्रमाणात सेवन करणे अधिक गरजेचे असते. त्यामुळे गुळाचे सेवन किती प्रमाणात करावे यासाठी आपल्या डॉक्टरांचा एकदा अवश्य सल्ला घ्यावा.

लठ्ठपणा होऊ शकतो (Obesity can occur)

गुळात थोड्या प्रमाणात साखर देखील आढळते त्यामुळे याचे जास्त सेवन केल्यास लठ्ठपणा होऊ शकतो. आहार तज्ञांच्या मते साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा येतो आणि गोळा देखील थोड्या प्रमाणात साखर आढळते त्यामुळे गुळाचे नेहमी संतुलित सेवन करणे गरजेचे असते. तसेच ज्या व्यक्तींना आधीच लठ्ठपणाची समस्या आहे किंवा ज्या व्यक्तींचे आधीच प्रमाणाबाहेर वजन झाले आहे त्या व्यक्तींनी गुळाचा चहा पिऊ नये.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. krishi jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: advantages and disadvantages of jaggery tea
Published on: 10 January 2022, 04:20 IST