ॲसिडिटीचा त्रास हा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असतो. या त्रासामध्ये छातीत फार मोठ्या प्रमाणात जळजळ होत असते.जर यामध्येमहत्वाचे कारण पाहिले तर खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे एक प्रमुख कारण आहे. ऍसिडिटी म्हणजे आपण जेवतो ते अन्न पचनासाठी हायड्रोक्लोरिक ऍसिड तयार होत असते. या तयार होणाऱ्या ऍसिडचे प्रमाण वाढल्यास ते ॲसिड पोटातुन अन्ननलिकेत आल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ लागतो.
ऍसिडिटी ची लक्षणे
- ऍसिडिटी मुळे पोटात आग व जळजळ होते.
- छातीत जळजळ होते.
- घशात जळजळ होते.
- मळमळते उलटी होते.
- तोंडात आंबट पाणी येते.
- तोंडाची चव बदलल्या सारखीवाटते.
- ढेकर येतात.
- पित्तामुळे डोके दुखते.
- अपचन होते
इत्यादी प्रमुख त्रास आम्लपित्तात होतात.
ऍसिडिटी होण्याची प्रमुख कारणे
- जास्त तिखट, मसालेदार, आंबट आणि चमचमीत पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
- वारंवार चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असणे.
- जेवणाच्या अनियमित वेळा
- भूक लागलेली असताना जेवण न करणे.
- गॅसेस,अपचन,जठराचा दाह झाल्यामुळे देखील ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
- मानसिक ताणतणाव
- पुरेशी झोप न होणे.
- मध्यपान, धूम्रपान तंबाखू अशा व्यसनामुळे देखील ऍसिडिटी होते.
ऍसिडिटी वरील उपचार व आहार
ॲसिडिटीचा त्रास झाल्यावर काय खावे?
- वरचेवर ऍसिडिटी होत असल्यास आहारात तूप घालून वरण-भात खावा. तुपामध्ये उत्तम पित्तनाशक गुणधर्म असल्याने त्याचा ऍसिडिटी मध्ये खूप चांगला उपयोग होतो.
- पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.
- केळी, डाळिंब खाणे ॲसिडीटीवर चांगले असते.
- ॲसिडिटीच्या त्रासात रोज रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात एक छोटा चमचा जिरे व धने घालून ठेवावेत व सकाळी उठल्याबरोबर ते पाणी प्यावे.
- फार वेळ उपाशीपोटी राहू नये. जेवणाच्या वेळा नियमित पाळाव्यात.
- ऍसिडिटी झाल्यास थंडगार दूध प्यावे.दुधामुळे पोटातील जळजळ कमी होते. तसेच एसिडिटी दाबून धरण्यासाठी तुम्हाला थंड दूध मदत करते.
- जेवणानंतर केळी खाव्यात. कारण की अन्न पचविण्यास मदत करते किंवा अन्न खाली ढकलायला मदत करते. ऍसिडिटी मध्ये पोटात गॅस तयार होतात त्यामुळे एखादा केळ खाल्ला तरी आराम मिळू शकतो.
- नारळ पाणी सुद्धा ऍसिडिटी वर रामबाण उपाय आहे. ऍसिडिटी झाल्यास नारळाचे पाणी प्यावे कारण त्यामध्ये पोटातील आग शमवणे ची क्षमता जास्त असते. साधारणतः एका नारळाचे पाणी पूर्ण वहळूहळू प्यावे.
ऍसिडिटी झाल्यावर काय खाऊ नये?
- तेलकट,तिखट पदार्थ,मसालेदार पदार्थ, खारट पदार्थ, लोणचे,पापड,बटाटा वडा, चिप्स, भजी, मैद्याचे पदार्थ खाणे तसेच चहा, कॉफी आणि कोल्ड्रिंक्स पीने टाळावे.
- ऍसिडिटी झाल्यावर लिंबू पाणी पिऊ नये.
- मध्यपान, तंबाखू आणि धुम्रपान पूर्णपणे बंद करावे.
- वारंवार पेन किलर च्या गोळ्या आणि औषधे घेणे टाळावे. ( माहिती स्त्रोत- हेल्थ मराठी )
टीप – कुठलाही औषधोपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Published on: 06 September 2021, 10:44 IST