या धावपळीच्या युगात 40 ते 60 टक्के लोकांना आम्लपित्त या रोगाने घेतले आहे डॉक्टरांकडून अनेक उपाय करून सुद्धा त्यांना त्यावर मात मिळवता आली नाही परंतु आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत कशाप्रकारे आम्लपित्तावर घरच्या घरी मात मिळवायची.अमृतरूपी दूधः दूधातील कँल्शिअमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्लनिर्मिती थांबते.व अतिरिक्त आम्ल दूध खेचून घेते. थंड दूध घेतल्याने पोटातली व छातीतली जळजळ कमी होते.हे पित्तशामक आहे, तूप घालुनही पिता येते.
बहुगुणी बडिशेपःबडिशेपमधिल अँटि अल्सर घटक पचन सुधारते याच्या सेवनाने पोटात थंडावा तयार होतो.व जळजळ कमी होते. बडिशेपेचे दाणे उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणि प्यायल्याने अँसिडिटि कमी होते.पाचक जिरेःजिरे हे फार चांगले अँसिड न्यूट्रलायजर आहे Digestive Cumin: Cumin is a very good acid neutralizer, याने अन्नपचन सुधारते अँसिड होत नाही याच्या सेवनाने. जेवणानंतर जिर्याचा काढा घेतल्यास पचन नीट होते. व अँसिडिटि होत नाही.
स्वादिष्ट व गुणकारी लवंग-लवंग चविला तिखट असली तरीही अतिरिक्त लाळ खेचून घेते. पचन सुधारते व पित्ताची लक्षणं दूर करते. लवंग तोंडात धरुन ठेवलि असता पित्ताची तिव्रता कमी होते.##औषधीवेलचीः। आयुर्वेदाप्रमाणे वेलची वात, पित्त, कफ यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते. पित्तापासून आराम मिळण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून सालीसकट) ती पाण्यात टाकून उकळवा. व थंड झाल्यावर प्यायल्याने तात्काळ आराम मिळतो.##वातहारकपुदिनाः। पुदिना पोटातलि आम्लाची तीव्रता कमी करतो. पुदिन्यातील थंडाव्यामूळे
पोटदुखी व जळजळ थांबते. पित्ताचा त्रास होत असल्यास पुदिन्याची पाने पाण्यात उकळवा. व थंड झाल्यावर हे पाणी प्यावे.यात असलेले मेंथाँल पचन चांगले करते.आलेःआल्यातील तिखट व पाचकरसामूळे आम्लपित्त कमी होते, पित्तापासून आराम मिळण्यासाठी आल्याचा तुकडा चघळत राहा. किंवा पाण्यात उकळवून व गूळ मिक्स करून प्यावे.पित्तशामक आवळाःतूरट, आंबट चवीचा आवळा कफ व पित्तशामक आहे रोज, मोरावळा, आवळ्याची पावडर, सुपारी, च्यवनप्राश असे
घेतल्यास आम्लपित्त होत नाही. आवळा मिठासोबत खाल्यास शरिरास सर्व षड्रस मिळतात.तुळसःरिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने चघळली असता पित्त कमी होते. नियमित तुळशीचे सेवन अँसिडिटि मूळापासून काढते.आरामदायि केळंकेळ्यातून शरिराला उच्च प्रतीच्या पोटँशियमचा पुरवठा होतो. त्यामूळे पोटात आम्ल, अँसिड निर्मिती होत नाही. तसेच फायबरशरिराची पचनक्रिया सुलभ करते.शहाळेःशहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरिरातील पीएच अँसिडिक लेव्हल कमी होउन अल्कलाईन होते.
याच्या पाण्याने अन्नपचन सुधारते व अँसिडिटि वाढणे कमी होते.अँपलसिडारव्हिनेगार- कधीकधी पोटात पूरेसे अँसिड तयार न झाल्याने अँसिड रिफ्लक्सचा त्रास होऊ शकतो. अश्या वेळी अँपल सिडार व्हिनेगार घेतल्याने फायदा होतो. ज्यांना हा त्रास आहे त्यांनी १-२ टीस्पून व्हिनेगार एक कप पाण्यात मिसळून घ्या. याने एसिड कमी तयार होते.गूळः गुळात मोठ्या प्रमाणात मँग्नेशिअम असते त्यामूळे आतड्यांचि शक्ति वाढते. जेवणानंतर एक
गुळाचा खडा खाल्यास आपला डायजेस्टिव्ह ट्रँक अल्कलाईन राहतो. व एसिडिटि होत नाही.दालचिनिः दालचिनि हि नैसर्गिक अँटासिड आहे याने बिघडलेले पोट जागेवर येते. एसिडिटिचा त्रास होत असल्यास याचा काढा करून प्यावा.जेष्ठमधः पोटाकरता अतिशय गुणकारी आहे सकाळी याचा काढा किंवा चूर्ण घेतल्यास संरक्षक आवरण तयार होते. व जळजळ होत नाही. आम्लपित्ताचा त्रास होत नाही.या व्यतिरिक्त काकडी, टरबूज, साळिच्या लाह्या, पपई, ताजे ताक, तूप या गोष्टी देखील आम्लपित्त कमी करतात.
सुनिता सहस्रबुद्धे
सुनील इनामदार
Published on: 26 August 2022, 11:02 IST