शरीरामध्ये असलेल्या कुठल्याही हाडांचे दुखणे राहिले की त्याचे सरळअर्थ हा शरीरामधील कॅल्शियमची कमी हा लावला जातो.
त्यामुळेकुठल्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करताच बरेच जण कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला सुरुवात करतात. परंतु हे कितपत योग्य किंवा सुरक्षित आहे याचा विचार कोणी करत नाही. हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता आहे हे तेवढेच खरे आहे. त्यामुळे कॅल्शियमच्या गोळ्या सर्रासपणे घेतल्या जातात.
परंतु यामध्ये कॅल्शियम शोषून घेण्यासाठी विटामिन डी लागते. परंतु हे घेतली जात नसल्याची स्थिती धोक्याची ठरू शकते. याबाबत ब्रिटनमध्ये 2650 लोकांवर संशोधन करण्यात आले असून याबाबतचा शोधनिबंध हार्ट मध्ये प्रकाशित झाला आहे. या मध्ये सांगण्यात आले आहे की कॅल्शियमच्या गोळीमुळे वयस्कर लोकांमध्ये हार्ट अटॅकचा धोका सामान्यांपेक्षा 33 टक्के वाढतो.
असे अभ्यासातून दिसून आल्या असूनअजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर स्वतंत्रपणे कॅल्शियम घेतले तर शरीर या वयात ते शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे हृदयाच्या महाधमनी ची झापड बंद होऊ शकते. सर्वात धोकादायक म्हणजे यामुळे स्टेनोसिसच्या व्हाल्व्हवर कॅल्शियमचे थर साचतात व त्यामुळे त्याची उघडझाप करण्याच्या क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन तसेच त्यातून शरीरातील ऑक्सिजन युक्त रक्ताचा पुरवठा कमी होऊ लागतो.
ओहिवोमधील क्लीव्हलँड क्लिनिक फाऊंडेशनच्या संशोधकांनी पाच वर्षे याबाबत अभ्यासकेला. यामध्ये कॅल्शियम सोबत विटामिन डी घेतले नाहीतर हृदयासंबंधी विकारांमुळे मृत्युमुखी पडण्याची शक्यता दुपटीने वाढते. असा दावा संशोधकांनी केला आहे. अशाच प्रकारचा एक ब्रिटिश मेडिकल जर्नल चा अहवाल 2010 मध्ये जाहीर झाला होता
त्यामध्ये देखील कॅल्शिअम घेणाऱ्यांना हृदयाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते असे नमूद करण्यात आले होते. खरे पाहायला गेले तर शरीरासाठी नैसर्गिक कॅल्शियम हे खूप महत्त्वाचे आणि उपयोगी आहे. डेअरी उत्पादने तसेच हिरव्या पालेभाज्या मधूनव माशांचे सेवनाने कॅल्शियम सहज उपलब्ध होते. त्यामुळे नैसर्गिक कॅल्शियम हे गोळ्यापेक्षा कितीही चांगले आहे व तितके आवश्यक देखील आहे.
(टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूहसहमत असेलच असे नाही.)
महत्वाच्या बातम्या
Published on: 23 May 2022, 10:33 IST