Health

वनस्पती व फळे यासारख्या अन्नात सल्फर अमायनो

Updated on 05 August, 2022 7:43 PM IST

वनस्पती व फळे यासारख्या अन्नात सल्फर अमायनो आम्ले कमी असल्याने त्यांचा संबंध हृदयविकाराची जोखीम कमी होण्याशी असतो,असे मत एका संशोधनात दिसून आले आहे. अमायनो आम्ले हे प्रथिनांचे पायाभूत घटक असतात. यातील सल्फर अमायनो आम्ले ही त्याचा एक उपघटक असतात. त्यात मेथिओनिन, सिस्टीन यांचा समावेश होतो, ती

आम्ले चयापचय व आरोग्यात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.Acids play an important role in metabolism and health.पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीचे जॉन रिची यांच्या मते गेली अनेक वर्षे सल्फर अमायनो आम्ले ही दीर्घायुष्यासाठी हानिकारक जात होती. त्याचे कारण म्हणजे माणसाने जर सल्फर अमायनो आम्ल असलेले अन्नघटक जास्त प्रमाणात घेतले तर आजार वाढण्याची शक्यता असते.

आहार आणि रक्तातील जैवखुणा यांचा अभ्यास ११००० लोकांच्या संदर्भात करण्यात आला, त्यात असे दिसून आले की, जे लोक सल्फर अमायनो आम्ले कमी प्रमाणात असलेले पदार्थ सेवन करीत होते.त्यांच्यात हृदयाशी संबंधित रोग कमी दिसून आले.कार्डिओमेटॅबोलिक डिसीज हा हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता यात कमी झाली.

रक्तातील जैवखुणा या कोलेस्टोरेलच्या वाढत्या प्रमाणासारखेच हृदयविकाराचे पूर्वसंकेत देत असतात.जास्त प्रमाणात सल्फर अमायनों आम्ले असलेले अन्न सेवन केल्यास ते धोकादायक असते. अन्नधान्ये, फळे व भाज्या वगळता अनेक अन्नपदार्थात सल्फर अमायनो आम्लांचे प्रमाण जास्त असते.

*याचाच अर्थ आपल्याला नसर्गिक व पारंपरिक आहार आजच्या जीवन शैलीत घेणं गरजेचं आहे. तसेच वरील संशोधन हे काही लोकांवर केले आहे, याचा अर्थ असा नाही कि प्रत्येक व्यक्तीला ते लागु होईल म्हणुन प्रत्येकाचा आहार हा त्याच्या प्रकृती नुसार असतो

 

Nutritionist & Dietician

Naturopathist

Dr. Amit Bhorkar 

whats app: 7218332218

English Summary: A heart-healthy plant-based diet
Published on: 05 August 2022, 07:43 IST