नुकतंच पिंपरी चिंचवडमध्ये अन्न व सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमधील महाराष्ट्र मिल्क डेअरीवर खंडणी विरोधी पथक आणि अन्न व सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांनी छापे टाकले. यावेळी तब्बल 600 किलो केमिकल मिश्रित पनीर जप्त करण्यात आलं आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, दुधाच्या पावडरमध्ये अॅसिटिक अॅसिड टाकून अतिशय गलिच्छ पद्धतीने हे पनीर तयार केलं जात होतं. मागील अनेक वर्षांपासून हा उद्योग सुरू होता, ही बाबदेखील तपासात समोर आली आहे. या प्रकरणी डेअरीचा मालक साजिद मुस्तफा शेखसह अन्य सहा जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
आता पुन्हा एकदा ग्राहकांच्या आरोग्यासोबत खेळ केला जात असल्याचं समोर आलं आहे. जर पनीरचा रंग निळा झाला असेल तर ते भेसळयुक्त आहे. भेसळयुक्त पनीर खाणं टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. अशा रितीने तुम्ही पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखू शकता. शुद्ध पनीर मऊ असतं.
आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
पण तुमचं पनीर घट्ट असेल तर ते भेसळयुक्त आहे, हे समजून घ्या. आपल्यातील अनेकांचा पनीर हा अतिशय आवडीचा पदार्थ असतो. घरी काही खास सण किंवा स्पेशल दिवस असला की बहुतेक घरांमध्ये पनीर बनवलं जातं आणि मोठ्या आवडीने खाल्लंही जातं.
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...
दरम्यान, पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण अलीकडे खूप वाढलंय. त्यामुळे पनीर विकत घेतल्यानंतर त्याची तपासणी करून नंतरच पदार्थ बनवा. शिवाय डेअरी प्रॉडक्टमध्येही भेसळीचं प्रमाण वाढत चाललंय, त्यामुळे विश्वासार्ह ठिकाणांहून प्रॉडक्ट्सची खरेदी करा. असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात १३०० कोटींचे पीककर्ज, शेतकऱ्यांना दिलासा..
ऊस मुकादमांकडून होणाऱ्या फसवणुकीला बसणार आळा, पोलिस महानिरीक्षकांचा मोठा निर्णय...
नाफेड अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाकडून हमीदराने चौदा हजार क्विंटल हरबरा खरेदी
Published on: 11 May 2023, 10:22 IST