पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही शासनाची महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येतात, हे आपल्याला माहिती आहे. परंतु या योजनेच्या सोबतच एक सरकारची पेन्शन योजना जोडलेली असून शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
जर तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजनाचे लाभार्थी असाल तर तुम्हाला पीएम किसान मानधन योजनेचा देखील फायदा घेता येऊ शकतो. पीएम किसान सम्मान निधि योजना नोंदणी केल्यानंतर तीच नोंदणी पीएम किसान मानधन योजनेत देखील केली जाते. नेमके काय आहे ही योजना? त्याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवर केला 'हा' मोठा बदल; जाणून घ्या सविस्तर
कुठलाही पैसा खर्च न करता पेन्शनचा लाभ
जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला कुठल्याही कागदपत्र विना पीएम किसान मानधन योजना नोंदणी केली जाते. मानधनी योजनेसाठी लागणारा जो पैसा आहे तो सन्मान निधी अंतर्गत मिळणाऱ्या पैशातून कट केला जातो.
परंतु यासाठी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो. तेव्हाच पैशांमधून आवश्यक रक्कम कापली जाते. पंतप्रधान किसान मानधन योजनेचा महत्वपूर्ण फायदा म्हणजे तुमच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये पेन्शन मिळते व यासाठी वयाच्या साठ वर्षानंतर पैसे कापणे देखील बंद होते.
नक्की वाचा:राज्यात शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू, वर्षाकाठी मिळणार 12 हजार रुपये.
या योजनेमध्ये लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मासिक पेन्शनची सोय देण्यात आली असून शेतकऱ्यांनी वयाची साठ वर्ष ओलांडल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिले जाणार आहे.
म्हणजेच या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एका वर्षात 36 हजार रुपयांचा फायदा होतो. यासाठी 18 ते 40 वयोगटातील कोणताही शेतकरी नोंदणी करू शकतो.वयानुसार प्रति महिन्याला या योजनेत पैसे जमा करावे लागते. यामध्ये तुम्ही 55 रुपये ते दोनशे रुपयांपर्यंत ठेवी येऊ शकतात.
या योजनेचे आर्थिक गणित
या योजनेमध्ये प्रति महिन्याला 55 रुपये ते जास्तीत जास्त 200 रुपये जमा करावे लागतात. या हिशोबाने कमीत कमी वार्षिक 2400 रुपये आणि कमीत कमी वार्षिक 660 रुपये योगदान देणे गरजेचे आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे सहा हजार रुपये मिळाल्यावर 2400 रुपयांची योगदान वजा केल्यावर पीएम किसान सम्मान निधिच्या खात्यात 3600 रुपये शिल्लक राहतील.त्याच वेळी वयाच्या 60 व्या वर्षानंतर एकूण लाभ हा 42 हजार रुपये प्रतिवर्ष होईल.
नक्की वाचा:राज्यात शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री किसान योजना सुरू, वर्षाकाठी मिळणार 12 हजार रुपये
Published on: 12 September 2022, 11:51 IST