समाजातील प्रत्येक घटकाचे आयुष्य सुलभ आणि आर्थिक दृष्ट्या भक्कम व्हावे यासाठी केंद्र सरकारकडून विविध प्रकारच्या योजना चालवल्या जात आहेत.
या योजनांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनांचे जीवन सुखकारक व्हायला मदत झाली आहे. आता या सगळ्यांमध्ये जर आपण कुठल्याही प्रकारच्या विमा चा विचार केला तर एक भविष्यकालीन आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची गोष्ट आहे.
कारण येणारा भविष्यकाळ कसा येईल, कुठल्या समस्या येतील आणि किती पैसा लागेल याचा कुठल्याही प्रकारे अंदाज बांधता येत नाही. परंतु बऱ्याच प्रकारच्या विमा योजना या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असल्यामुळे केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सर्वसामान्य लोकांसाठी खूपच फायद्याचे आहे.या योजनेबद्दल आपण या लेखामध्ये माहिती घेऊ.
नक्की वाचा:२५० रुपये खर्च करून 'हे' खात चालू करा अन मिळवा तब्बल १५ लाख, वाचा सविस्तर
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
केंद्र सरकारने एक जून पासून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेच्या प्रीमियम मध्ये वाढ केली असून आता या योजनेचा वार्षिक प्रिमियम जो अगोदर अवघा बारा रुपये होता तो आता वीस रुपये करण्यात आला आहे.
या वार्षिक वीस रुपयांमध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून दोन लाखांचा मृत्यू विमा मिळतो. जीवन जगत असताना आलेल्या वेगवेगळ्या परिस्थितीत एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाते.
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात किंवा तुमच्या जवळच्या बँक शाखेत भेट देऊन प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना चा फॉर्म भरू शकता.
तुम्हीही योजनेचा लाभ कुठल्याही सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खाजगी क्षेत्रातील बँकेतून घेऊ शकतात.फक्त यासाठी अर्जदाराचे कुठल्याही बँकेत खाते असणे आवश्यक असून या योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यातून थेट डेबिट केला जातो. हा फार्म मराठी भाषेत देखील उपलब्ध असूनतुम्ही तुमचे खाते असलेल्या बँकेत जाऊन हा फॉर्म भरून सबमिट करू शकतात.
नक्की वाचा:म्हातारपण करा आरामदायी, घ्या लाभ 'या' योजनेचा मिळवा दरमहा 5 हजार रुपये
या योजनेचा प्रीमियम तुमच्या बँक खात्यातून ऑटोमॅटिक डेबिट केला जातो यासाठी तुम्हाला फॉर्म भरताना यासंबंधीची मंजुरी द्यावी लागते.त्यानंतर दरवर्षी 1 जून रोजी तुमच्या खात्यातून ही रक्कम डेबिट केली जाते.या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी 18 तर जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असावे.
या योजनेच्या माध्यमातून मिळणारे लाभ
जर व्यक्तीचे अपघातामुळे दोन्ही डोळे किंवा दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावले गेले तर किंवा एक डोळा आणि एक हात किंवा एक पाय गमावल्यास कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये दिले जातात.दुसरी गोष्ट म्हणजे जर अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले जसे की डोळ्याची दृष्टी कमी होणे किंवा हात किंवा पाय गमावणे अशा बाबतीत एक लाख रुपये दिले जातात.
Published on: 08 June 2022, 02:55 IST