Government Schemes

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या समाजातील प्रत्येक घटकासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या महत्त्वाच्या योजना असून या योजनांचा लाभ घेणे खूप महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्र असो की एखाद्या व्यवसाय उभारणीसाठी लागणार्या भांडवलाची समस्या सोडविण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा शंभर टक्के आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून एखादा व्यवसाय उभारण्यासाठी असलेले भांडवलाची समस्या या माध्यमातून सोडवून व्यक्तिला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे हा देखील महत्त्वाचा उद्देश यामागे आहे.

Updated on 24 October, 2022 4:26 PM IST

केंद्र सरकार आणि राज्य सरकारे यांच्या समाजातील प्रत्येक घटकासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या महत्त्वाच्या योजना असून या योजनांचा लाभ घेणे खूप महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्र असो की एखाद्या व्यवसाय उभारणीसाठी लागणार्‍या भांडवलाची समस्या सोडविण्यासाठी या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात किंवा शंभर टक्के आर्थिक मदत करण्यात येते. जेणेकरून एखादा व्यवसाय उभारण्यासाठी असलेले भांडवलाची समस्या या माध्यमातून सोडवून व्यक्तिला त्याच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करणे हा देखील महत्त्वाचा उद्देश यामागे आहे.

अशाच एका महत्त्वपूर्ण योजना असून ज्या माध्यमातून दहा ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज सुविधा कुठल्याही हमी शिवाय मिळते. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती घेऊ.

नक्की वाचा:PM Kisan Yojana: केंद्र सरकारचा मोठा निर्णय! पीएम किसान योजनेत केले हे बदल; जाणून घ्या नवीन नियम...

 पीएम स्वनिधी योजना आणि तिचे फायदे

 जर आपण या योजनेचा विचार केला तर कोरोना कालावधीमध्ये रस्त्यावरील विक्रेते आणि छोटे व्यवसायिक यांची पूर्ण आर्थिक घडी विस्कटली होती. परंतु अशा बिकट परिस्थितीत केंद्र सरकारची पीएम स्वनिधी योजना खूप महत्त्वाची ठरली.

कोरोना कालावधीत बंद पडलेले व्यवसाय किंवा आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांना पुन्हा ऊर्जा देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली. या योजनेच्या अंतर्गत गरजू लोकांना दहा हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा मिळते.

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गॅरंटी म्हणजे हमी द्यावी लागत नाही. कुठल्याही हमी शिवाय सरकार गरजू व्यक्तीला कर्जाचा पुरवठा करते. हे कर्जरूपाने घेतलेली रक्कम एक वर्षाच्या काळात परत केली जाऊ शकते किंवा दरमहा कर्ज हप्ते भरण्याची सुविधा देखील या योजनेत देण्यात आली आहे.या कर्जावर सात टक्के दराने व्याज आकारले जाते. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या खर्चावर अनुदान देखील दिले जाते.

समजा तुम्ही कल्याण दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते व्यवस्थित परतफेड केली तर दुसऱ्यांदा तुम्हाला दहा ऐवजी 20 हजार रुपयांचे कर्ज मिळते. या योजनेत व्याज अनुदान आणि कॅशबॅक मिळाल्यामुळे कर्जाची रक्कम ही व्याजमुक्त होते.

नक्की वाचा:केंद्र सरकारचा मोठा निर्णय! सर्वसामान्यांना मिळणार 5 लाख रुपयांचा लाभ; असा करा अर्ज

अर्ज कुठे करावा?

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी बँकेत अर्ज करावा लागतो. बँकेत जाऊन तुम्हाला या योजनेचा एक फॉर्म मिळतो तो घेऊन भरावा लागतो. या फार्ममध्ये सर्व आवश्यक माहिती तपशीलवार भरून त्यासोबत तुमच्या आधार कार्डची प्रत जोडणे आवश्यक आहे.

त्यानंतर तुम्ही फार्ममध्ये भरलेली माहिती  बँकेचे अधिकारी तपासून मग तुम्हाला कर्ज मंजूर करताना. या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज आहेत तारणमुक्त कर्ज असून कुठल्याही हमीशिवाय व्यवसायासाठी मोफत कर्ज दिले जाते. यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

 वाचा:दिवाळीच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांना दिलासा; 'या' जिल्ह्यातील 55 हजार शेतकऱ्यांना 200 कोटींचे प्रोत्साहन अनुदान

English Summary: you can 10 thousand to 50 thousand loan without morgage by pm swanidhi yojana
Published on: 24 October 2022, 04:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)