ग्राहकांनो चांगल्या भविष्यासाठी तुम्ही जर सुरक्षित गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. आज आम्ही तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह (safe investment) चांगला परतावा मिळेल, अशा योजनेविषयी सांगणार आहोत.
एलआयसीने महिलांची आर्थिक गरज ओळखून त्यांच्यासाठी खास एक योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आधार शिला योजना. यामध्ये महिला अगदी कमी गुंतवणूक करून एक मोठी रक्कम मिळवू शकतात. महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे.
8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या (LIC) या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्हाला दररोज फक्त २९ रुपये जमा करायचे आहेत. तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात.
दिलासादायक! फळे आणि भाजीपाल्यांच्या वाहतुकीवर मिळणार ५०% सबसिडी; घ्या असा लाभ
इतका मिळणार परतावा
समजा तुम्ही 20 वर्षे दर महिन्याला 899 रुपये म्हणजेच दिवसाला 29 रुपये जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी जमा केले तर 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक होईल.
ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला आपलं भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी रक्कम त्यांना मिळेल.
पण ही अट पाळणं गरजेचं LIC ची आधार शिला योजना (Aadhaar Shila Scheme) सुरक्षा (safe) आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेता येईल.
सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर
एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक (policy) आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला पैसे मिळतात. यामध्ये ३ लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता.
७० वर्षांपर्यंत तुम्ही ही स्कीम एक्स्टेंड करू शकता. प्रीमियमचे पैसे तुम्ही महिना, तिमाही किंवा सहा महिन्यांनी भरू शकता. बचतीचा विचार केला तर महिलांना या योजनेचा चांगला नफा होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या
पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर करा हे काम
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा करा आणि दरमहा मिळवा पेन्शन
पीएनबी किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; असा करा अर्ज
Published on: 24 September 2022, 03:24 IST