पीएम किसान मानधन योजनेअंतर्गत, देशातील सर्व लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना वृद्धापकाळात जीवन जगण्यासाठी सरकारकडून पेन्शन दिली जाणार आहे. ही योजना केंद्र सरकारने 31 मे 2019 पासून सुरू केलेली आहे. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेंतर्गत, वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर देशातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा ३००० रुपये पेन्शनची रक्कम दिली जाणार आहे.
या योजनेला शेतकरी पेन्शन योजना असेही म्हणतात. या शेतकरी पेन्शन योजना 2023 अंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थींचे वय 18 ते 40 वर्षे असावे. या किसान मानधन योजनेचा लाभ 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असलेल्या लाभार्थ्यांना दिला जाईल. या योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थीचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास लाभार्थीच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये दिले जातील.
पंतप्रधान किसान मानधन योजनेच्या प्रीमियमचा भरणा -
किसान पेन्शन योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांना दरमहा प्रीमियम भरावा लागेल. 18 वर्षे वयाच्या लाभार्थ्यांना दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल आणि 40 वर्षे वयाच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रीमियम भरावा लागेल. वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल. पीएम किसान मानधन योजना 2023 अंतर्गत, लाभार्थीचे बँक खाते असले पाहिजे आणि बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे. या योजनेंतर्गत वृद्धापकाळात दिलेली रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
या योजनेसाठी पात्रता-
देशातील लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या योजनेंतर्गत पात्र मानले जातील. 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेतीयोग्य जमीन असावी. अर्जदाराचे वय 18 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावे. आधार कार्ड,ओळखपत्र,वय प्रमाणपत्र,उत्पन्न प्रमाणपत्र,बँक खाते पासबुक,मोबाईल नंबर,पासपोर्ट आकाराचा फोटो ही सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे.या योजनेसाठी इच्छुक शेतकरी https://maandhan.in/ या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.
Published on: 04 October 2023, 12:17 IST