भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे केंद्र सरकारचा सगळा फोकस हा शेतीवर आहे. शेती आणि शेतकऱ्यांची प्रगती झाली म्हणजे देशाचा विकास हे एक सूत्र आहे.
शेतीआणि संबंधित कामे सुलभ व्हावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी केंद्र तसेच राज्य शासनामार्फत विविध प्रकारच्या योजना आखण्यात येतात व त्यांची अंमलबजावणी देखील सुरू आहे.यामध्ये सध्या केंद्र शासनाकडूनशेतीवर भर दिला जात असूनसेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी देखील शासन प्रयत्नशील आहे.
त्या माध्यमातून देखील विविध प्रकारच्या योजना केंद्र सरकार कडूनअमलात आणल्या गेल्या आहेत व काही भविष्यातआणल्या जातील.यातीलच एक योजना म्हणजे परंपरागत कृषी विकास योजना योजना ही असून योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यात येते. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती घेऊ.
नेमकी काय आहे ही योजना?
या योजनेच्या माध्यमातून पारंपारिक शेती विषय विज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांच्या एकत्रित मदतीने या योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे एक शाश्वत मॉडेल तयार केले जाणार असून या योजनेअंतर्गत क्लस्टर बांधकाम, क्षमता निर्माण तसेच प्रोत्साहन, मूल्यवर्धन आणि विपणन यासाठीआर्थिक सहाय्य दिले जाते.
या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना तीन वर्षांपर्यंत शेतीसाठी हेक्टरी पाच हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत करते तसेचसेंद्रिय खते आणि कीटकनाशके,बियाणे इत्यादीसाठी प्रति हेक्टरी 31 हजार रुपये,तसेच मूल्यवर्धन आणि विपणन यासाठी आठ हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर तीन वर्षासाठी दिले जातात. याबाबतीत एक अहवालाचा संदर्भ घेतला तर या योजनेत गेल्या चार वर्षात सुमारे एक हजार 197 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा तर असा करा अर्ज
1-सगळ्यात आगोदर या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे.
2- त्यानंतर तिथे Apply nowहा पर्याय दिसेल.त्यावर क्लिक करावे.
3-त्यानंतर एक अर्ज तुमच्यासमोर ओपन होतो.या अर्जात तुम्ही तुमची सर्व आवश्यक माहिती भरावी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे.
4- शेवटी सबमिट बटणावर क्लिक करून ही प्रक्रिया पूर्ण करावी.
महत्वाच्या बातम्या
Published on: 26 May 2022, 11:39 IST