Government Schemes

शेतीसाठी सिंचन खूप अत्यावश्यक असून सिंचनाची व्यवस्थापन करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे आहे. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा साठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल त्यामागचा उद्देश असतो.

Updated on 30 July, 2022 7:49 PM IST

शेतीसाठी सिंचन खूप अत्यावश्यक असून सिंचनाची व्यवस्थापन करताना शेतामध्ये विहीर किंवा बोरवेल असणे खूप गरजेचे आहे. शासनाकडून शेतीला पाणीपुरवठा साठी विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येतात. विविध योजनांच्या  माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळेल व त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढेल त्यामागचा उद्देश असतो.

अशीच एक शासनाची महत्त्वपूर्ण योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना होय. योजना महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टल व अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येते.

नक्की वाचा:योजना पोस्ट खात्याची: करा छोटीशी गुंतवणूक आणि मिळवा लाखो रुपये, वाचा 'या' योजनेची सविस्तर माहिती

 नेमकी काय आहे हि योजना?

योजना महाराष्ट्रातील सांगली,रत्नागिरी, सिंधुदुर्गात तसेचकोल्हापूर आणि मुंबई येथे जिल्हा सोडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येते.

 योजनेअंतर्गत असा मिळतो आर्थिक लाभ

1- नवीन विहिरीसाठी 2 लाख 50 हजार रुपये

2- इनवेल बोअरिंग साठी वीस हजार रुपये

3- जुनी विहिरींच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये

4- पंप संच घेण्यासाठी वीस हजार रुपये

5- वीज जोडणी आकार दहा हजार रुपये

6- शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये

7- सुष्म सिंचन संच 50 हजार रुपये

8- तुषार सिंचनासाठी पंचवीस हजार रुपये

9- पीव्हीसी पाईप साठी तीस हजार रुपये

नक्की वाचा:Crop Insurance Scheme: पीक विमा योजनेसाठी महसूल विभागाचा पुढाकार; घेतला 'हा' मोठा निर्णय

आवश्यक कागदपत्रे

1- नवीन विहिरी साठी सक्षम प्राधिकारी कडील अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र

2- सातबारा व आठ अ चा उतारा

3- वार्षिक उत्पन्नाचा दाखला

4- लाभार्थी अपंग असेल त्याचा पुरावा

5- शेत जमिनीचा दाखला आणि विहीर  नसल्याचे प्रमाणपत्र

6- विहीर असेल तर विहीर सर्वे नंबर नकाशा व चतुर सीमा

7- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडे पाणी उपलब्ध असल्याचा दाखला

8- कृषी अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय पाहणी व शिफारस पत्र असणे आवश्यक

9- गटविकास अधिकार्‍याचे शिफारस पत्र व जागेचा फोटो

 पात्रता

1-योजनेचा लाभ घेण्यासाठी सदरील व्यक्ती अनुसूचित,एस सी जाती प्रवर्गातील असणे आवश्यक

2- व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा एक ते दीड लाखांपर्यंत

3- जमिनीचा सातबारा व आठ अ चा उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक

4- योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्ती कडे 0.20 हेक्टर ते सहा हेक्टर पर्यंत जमीन असणे आवश्यक

नक्की वाचा:Central Govt Scheme: ...तर घर बसल्या डाउनलोड करा 'हे' कार्ड; सरकार देतंय 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

English Summary: this scheme give financial supprt to farmmer for digging wall and borewell in farm
Published on: 30 July 2022, 07:49 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)