शेतीला पाण्याची सोय असणे खूप गरजेचे असते हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी शेतकरी विहिरी किंवा कूपनलिकांचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कारण पाणी शिवाय शेती नाही हे एक सूत्रच आहे. मागील काही वर्षांपासून शेततळे हे शेतकऱ्यांचा जमिनीसाठी पाण्याचे एक उत्तम साधन म्हणून पुढे आले आहे.
परंतु शेततळ्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर तो खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना तो खर्च करणे शक्य होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अनुदानाची सोय केली आहे. या योजनेची या लेखात माहिती घेऊ.
सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के अनुदान
शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून सामूहिक शेततळ्यासाठी शंभर टक्के तर वैयक्तिक शेतकऱ्यासाठी 50 टक्के पर्यंत अनुदान या माध्यमातून दिले जाते. या साठी नवीन अर्ज सुरू करण्यात आले आहेत. ही योजना 'महाडीबीटी फार्मर स्कीम पोर्टल' अंतर्गत राबवल्या जातात. जर तुम्हाला या योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही तो करू शकतात.
मुख्यमंत्री कृषी शाश्वत सिंचन योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक शेततळ्यासाठी कमाल 75000 पर्यंत अनुदान दिले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी असलेल्या दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे सामूहिक शेततळे योजना ही होय. यामध्ये शेतकऱ्यांच्या समूहासाठी एकात्मिक फलोत्पादन अंतर्गत शंभर टक्के अनुदान दिले जाते मात्र या योजनेसाठी तुमच्या गट असणे गरजेचे आहे. एवढेच नाही तर तुमच्या गटाची नोंदणी करणे देखील गरजेचे आहे.
नक्की वाचा:शेतकरी मित्रांनो वेस्ट डीकंपोजरने तुमचे उत्पन्न वाढणार; फक्त 'या' पद्धतींचा करा वापर
या योजनेच्या महत्त्वाच्या अटी
1- या योजनेच्या लाभासाठी वैयक्तिक शेतकरी अर्ज करू शकत नाहीत.
2- या योजनेचा लाभ घेण्यासाठी गट असणे गरजेचे आहे म्हणजेच दोन किंवा दोनपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा गट असणे गरजेचे आहे.
3- शेतकरी हे वेगवेगळ्या कुटुंबातील असावेत.
4- तसेच गटातील प्रत्येक शेतकऱ्याचा सातबारा उतारा असणे गरजेचे आहे.
5-तसेच तुम्ही शेततळ्यातील पाण्याचा वापर कराल तर तो सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून करणे बंधनकारक आहे. तुम्ही पाण्याचा वापर तुषार किंवा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कराल, यासंबंधीचे हमीपत्र तुम्हाला द्यायला लागेल.
कोणते शेतकरी करू शकतात अर्ज?
जर आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत विचार केला तर यामध्ये 15 जिल्हे असून या सोबत विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली सोबतच कोकणातील पालघर, रायगड,ठाणे आणि सिंधुदुर्ग तसेच
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा व सांगली जिल्ह्याचा यामध्ये समावेश आहे. वर उल्लेख केलेल्या जिल्ह्यातील सर्व संवर्गातील शेतकरी अर्ज करू शकतात. यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जमिनीचा सातबारा व जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; शेततळे बांधण्यासाठी 2 लाख रुपयांपर्यंत मिळणार अनुदान
Published on: 04 September 2022, 12:29 IST